Breaking News

श्रीगोंदे शहरात पथदिव्याची केबल जळाली कचरा पेटवल्याने घडला प्रकार


कोळगाव/प्रतिनिधी :
श्रीगोंदे शहरातील पथदिव्याची केबल पेटवलेल्या कचर्‍यामुळे जळाली. सरस्वती नदीवरील रस्त्याच्या मधोमध पथदिवा आहे. रविवारी दुपारी या पोलजवळील कचरा कोणीतरी पेटवून दिला. यात पथदिव्याची केबल जळून खाक झाली. दुपारच्या वेळी पथदिव्याचे स्वीच बंद असल्याने विपरीत घटना टळली. पथदिव्याच्या पोलजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला होता. रविवारी दुपारी हा कचरा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला. या कचर्‍याबरोबर या पोलची केबलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. हा प्रकार लवकर कुणाच्याही लक्षात आला नाही. त्यातच दुपारची वेळ असल्याने या पथदिव्याचा स्वीच बंद होता. त्यामुळे विपरीत घटनाही टळली. पालिकेच्या पदाधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दक्ष नागरिक फौंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी सांगितले.