Breaking News

फक्त घरावर दोन बोर्ड आणी ब्राह्मणवादाचा खात्मासुरू

‘बहुजननामा’
बहुजनांनो.... !   
-1-
भारताचे सर्व पुरोगामी व डावे ज्या पद्धतीने या नागरिकत्व सुधारणा कायद्याला (उअअ, छझठ रपव छउठ) विरोध करीत आहेत, तीपद्धत संघ-भाजपाच्या वैदिकी-ब्राह्मणांना मदतकारक ठरते आहे. प्रत्येक युद्धात शत्रूचे सामर्थ्य व कमजोरी शोधून त्यावर हल्ला केला पाहिजे, हा साधासुधा युद्धाचा नियमही आमच्या डाव्या-पुरोगाम्यांना माहीत नाही. ते सत्ताधारी शत्रूला ‘हिंदू’ मानतात ही या डाव्या-पुरोगाम्यांची सर्वात मोठी चूक आहे. वैदिकी-ब्राह्मण हा स्वतःला ‘हिंदू’ मानून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहे व विरोधक त्याला हिंदूच मानतात. मग यात विरोध आलाच कुठे? डावे-पुरोगामी हे या शत्रूला हिंदूच मानीत असतील तर, लढाई सुरूच होऊ शकत नाही. कारण दोघेही एकाच दिशेने एकमेकांना पूरक म्हणून धावत आहेत.एकमेकांना शत्रू मानणारे दोन्ही लोक समांतरपणे एकाच दिशेने धावत असतील तर ते एकमेकांना भीडणार केव्हा व त्यांच्यात लढाई सुरू होणार केव्हा?

या देशातील वैदिकी-ब्राह्मणांची सर्वात मोठी कमजोरी ही आहे की, ते ‘हिंदू’ नाहीत. हिंदू-सिंधू संस्कृतीचा द्वेष करण्यातच त्यांची पाच हजार वर्षे सक्रियपणे गेलेली आहेत. आणी आज अचानक ते स्वतःला हिंदू म्हणवून घेत असतील, तर त्यांना ठणकावून सांगीतले पाहिजे की, ‘ब्राह्मण हे हिंदू नाहीत.’ शत्रूच्या कमजोरीवर वार करण्याऐवजी ती कमजोरी सामर्थ्यात बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मदत करणे म्हणजे मुर्खपणाच म्हटला पाहिजे. परंतू असा मुर्खपणा डावे-पुरोगामी जाणीवपूर्वक करतात, कारण त्यांचे वैचारिक नेतृत्व करणारे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वैदिक-ब्राह्मणच आहेत. कोणत्याही चांगल्या मुद्द्याला धार्मिक धृवीकरणाचे वळण देण्याचा हातखंडा असलेल्या वैदिकी-ब्राह्मणांना शत्रू म्हणून पराभूत करायचे असेल तर त्यांच्या इच्छेप्रमाणे धार्मिक धृवीकरण न होऊ देणे व त्याला दुसर्याम अशा धृवीकरणाचे वळण देणे की, जेणेकरून सत्ताधारी वेदिकी-ब्राह्मण स्वतःच स्वतःच्या जाळ्यात अडकतील व पराभूत होतील. जाणते-अजाणतेपणाने वैदिकी-ब्राह्मणांनी एक खूप चांगली संधी नागरिकत्वाच्या निमित्ताने आपणास प्राप्त करून दिलेली आहे. ईस्त्रायल हे एक शक्तीमान राष्ट्र आहे व ते आपल्या देशातील वैदिकी-ब्राह्मणांचे मित्र-राष्ट्र आहे. जगात असे कधीच कुठे घडत नाही की, एखाद्या देशाचे परराष्ट्र धोरण त्याच देशातील एका समुहाच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधी असते. परंतू भारतात असे होते, होत आले आहे व आताही तेच घडत आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाप्रमाणेईस्त्रायल हे मित्र-राष्ट्र नाही. परंतू भारतातच राहणार्या  वैदिकी-ब्राह्मणांचे मित्रराष्ट्र ईस्त्रायल आहे. वैदिकी-ब्राह्मण 1999 साली सत्तेवर येताच अनधिकृतपणे ईस्त्रायल राष्ट्र मित्र-राष्ट्रांच्या यादीत आले.2014 पासून वैदिकी-ब्राह्मण दिल्लीत भक्कमपणे सत्तेवर येताच सरकारी षडयंत्रे यशस्वी करण्यासाठी ईस्त्रायलकडून सुरक्षा यंत्रणा व विज्ञान-तंत्रज्ञानाचीघेवाण सुरू झालेली आहे.अलिकडेचसंजय राउत व शरद पवार यांचे फोन टॅप करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान ईस्त्रायलने फडणवीसांना पुरवीलं.
-2-
थोडक्यात सांगायचे तर ईस्त्रायल हे राष्ट्र आपल्या देशातील वैदिकी-ब्राह्मणांसाठी एक ‘आदर्श’ राष्ट्र व मित्र-राष्ट्र आहे. आता त्यांच्या या मित्राच्या खांद्यावरच बंदूक ठेवून शत्रूला शूट-आऊट करण्याची संधी डाव्या-पुरोगाम्यांना प्राप्त झालेली आहे. ईस्त्रायल हे नव्याने स्थापन झालेले राष्ट्र आहे. दुसर्याल महायुद्धानंतर ते अस्तित्वात आले. या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्राचे नागरिक कोण होऊ शकते व त्याची कसोटी काय? ईस्त्रायल राष्ट्राच्या कर्त्यांनी जगभर ऐलान केले की, जेथे कुठे ज्यु लोक राहात असतील त्यांनी ईस्त्रायलदेशात यावे, त्यांना नागरिकत्व देण्यात येईल. त्यासाठी त्यांच्याकडे कोणताही कागदोपत्री पुरावा मागीतला जाणार नाही. मात्र त्यांना ‘डीएनए’ टेस्ट द्यावी लागेल. डीएनए टेस्टिंग हा अत्याधुनिक वैज्ञानिक पुरावा आहे. जन्माचे दाखले, धर्माचेपुरावे व स्कूल-कॉलेजची सर्टिफिकेट्स खोटी असू शकतात, कारण हजार-पाचशे रूपये दिल्यावर कोणतेही प्रमाणपत्र वा खोट्या पदव्या वगैरे सहज मिळतात. मात्र डीएनए टेस्टचे निकष कधीच खोटे असू शकत नाहीत. त्यामुळे आजही ईस्त्रायलकडे कुणी नागरिकत्व मागायला गेले, तर त्याला त्याची डीएनए टेस्ट पॉझिटिव्ह असल्यावरच नागरिकत्व मिळते. भारताच्या कोकण किनारपट्टीत अनेक वर्षांपासून ‘वैदिक-ब्राह्मण’ म्हणून राहणारी काही कुटुंबे ईस्त्रायलमध्ये गेलीत व डीएनए टेस्टमध्ये उत्तीर्ण होऊन ते तेथेच ईस्त्रायलचे नागिरक म्हणून गुण्या-गोविंदाने राहात आहेत.
मित्र-राष्ट्र ईस्त्रायलचा आदर्श घेऊन भारतातही नागरिकत्वाचीकसोटी डीएनए टेस्ट असली पाहिजे. कारण या देशातील जनतेने हजारो वर्षांपासून अनेक उलथापालथी होऊनसुद्धा आपली मूळ सिंधू-हिंदू संस्कृती जतन करून ठेवलेली आहे. ते एकमेकांशी नेहमीच रक्ताच्या व दुधाच्या नावाने घट्ट बांधले गेलेले आहेत. धर्म बदलला, प्रदेश बदलला, भाषा बदलली, काळ बदलला मात्र मूळ संस्कृतीला त्यांनी आजही कुठे धक्का बसू दिलेला नाही. डीएनए टेस्टिंगमुळे एकही मुसलमान वा ख्रिस्ती ‘अभारतीय’ ठरू शकणार नाही. कारण त्यांनी धर्म बदलला आहे, देश नाही. जे काही बाबर, कासिमसारखे थोडेफार परकीय मुसलमान होते, त्यांनी व त्यांच्या वंशजांनी अनेकवेळा आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाह केलेला असल्यामुळे ते भारतीय वंशातच पूर्णपणे मिसळून गेलेले आहेत.
या देशात शक, हुण, कुशाण सारखे अनेक परकीय आक्रमक आलेले होते, त्यांचेही आता स्वतंत्र अस्तित्व कुठेच दिसत नाही. ते पूर्णपणे भारतीयच झालेले आहेत. मात्र आर्य नावाचे परकीय आक्रमक या देशात पाच हजार वर्षांपूर्वी आलेत आणी ते आजही आपले आर्यवंशीय अस्तित्व कायम ठेवून आहेत, ते भारतीय संस्कृतीत कधीच मिसळले नाहीत. आर्यांनी त्यांचे वेगळे अस्तित्व ठेवून शांततेने भारतात राहीले असते तर, भारताला काहीच अडचण नव्हती. मात्र स्वतःच्या आर्यवंशाला श्रेष्ठ ठरवून येथील मूळ हिंदू-सिंधू संस्कृतीला सतत हिन लेखले, येथील मूळ रहिवासींना शूद्र म्हणून, अस्पृश्य म्हणून गुलाम केले. त्यांनी केवळ देशातच घुसखोरी केली नाही, तर या देशातील संस्कृतीतही घुसखोरी करून तीला विकृत व विद्रूप केलेले आहे. जेव्हा जेव्हा ते राजकिय सत्तेत येतात, तेव्हा तेव्हा ते या देशाला रसातळाला नेतात. देशाच्या शैक्षणिक, आर्थिक, धर्मिक, राजकीय वगैरे सर्वच क्षेत्रात अराजकता माजवतात व देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात.
हे आर्य लोक परकीय असून ते आजही आपले वर्चस्ववादी वंश-श्रेष्ठत्व उघडपणे जपत आहेत. आपण हिंदू लोक कमरेला दोरा बांधतो, आर्य लोक गळ्यात दोरा (जाणवं) घालतात. त्यांचं मूळ ‘गोत्र’ आहे, आपले हिंदूंचे मूळ ‘कूळ’ आहे. आर्य हे पुरूषसत्ताक आहेत, आपण हिंदू मातृसत्ताक आहोत. आर्य भटके-पशूपालक होते, आपण हिंदू प्राचिन काळापासून आजपर्यंत शेतीवर उपजिवीका करतो आहोत. लग्न जुळवतांना ते मुला-मुलीचे गोत्र विचारतात, आपण हिंदू कूळ विचारतो. आपल्यात बहिण-भावात लग्न होऊच शकत नाही, कारण आपण कूळ विचारूनच लग्न जुळवतो. मात्र आर्य-ब्राह्मणात भाऊ-बहिणमध्ये लग्न होऊ शकतं, कारण ते गोत्र विचारून लग्न जुळवितात. अशी हजारो लक्षणे आहेत कि ज्यामूळे ते लाखोवेळा परकीय आक्रमक म्हणून सिद्धहोऊ शकतात. त्यामुळे डीएनए टेस्टमध्ये देशातील वैदिकी-ब्राह्मण हे नापास होतील व त्यांना डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकणे सहज शक्य होईल. भारतीय समाजापासून आर्य-ब्राह्मणांना ‘अभारतीय’ म्हणून वेगळे काढल्यावर या देशाचे 50 टक्के प्रश्‍न एका मिनिटात खतम होतील. मात्र हे होणे नाही, कारण सत्ताधारी वैदिकी-ब्राह्मणांचे विरोधक असलेले पुरोगामी-डावे लोक हे एकतर भट आहेत किंवा भटाळलेले आहेत. आणी उरलेले नेते हे त्यांच्याकडील ईडी, सिडी, सीबीआय वगैरेंच्या दहशतीचे बळी आहेत.
-3-
सत्ताधारी वैदिकी-ब्राह्मणांच्या वंश-श्रेष्ठत्वाच्या मृत्यूची सुरूवात नागरिकत्वाच्या डीएनए टेस्ट मध्ये आहे. नागरिकत्वाची कागदपत्रे मागायला आलेल्या सरकारी कर्मचारी व अधिकार्यां साठी एक बोर्ड आपल्या घरावर लावा. तो बोर्ड पुढीलप्रमाणे- “नागरिकत्वासाठी कागदपत्रे मागायला आलेल्या कर्मचारी-अधिकार्यांगना नम्र विनंती- कोणत्याही प्राचिन राष्ट्राचे नागरिकत्व ठरविण्यासाठी डीएनए टेस्ट हे सर्वात आधुनिक व वैज्ञानिक साधन आहे. आपल्या प्राचिन भारत देशाचे नागरिकत्व ठरविण्यासाठी डीएनए टेस्ट करणार असाल तर आम्ही आपणास पूर्ण सहकार्य करू. मात्र कागद-पत्र मागणार असाल तर, या घरातून कोणतेही सहकार्य मिळणार नाही.’’ आणखी एक बोर्ड जर आपल्या दरवाज्यावर लावला तर वैदिकी-ब्राह्मणवाद पूर्णपणे मूळातून उखडून टाकायला मदत होईल. दर दहा वर्षांनी होणार्याण राष्ट्रीय जनगणनेत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आता प्रश्‍न केवळ ओबीसी जनगणनेचा नाही. ज्यांना जातीव्यवस्था समूळ नष्ट करायची आहे, त्यांचेजवळ जातीचा कोणता डेटा उपलब्ध आहे? कारण एखाद्या देशाची समाजव्यवस्था मूळातून उखडून टाकायची असेल तर त्यासाठी त्या समाजव्यवस्थेतील प्रत्येक समाज-घटकाचा डेटा आपल्याकडे पाहिजे. शास्त्रशूद्ध पद्धतीने अभ्यास करून काही निष्कर्ष जगाच्यासमोर मांडावे लागतात. त्यातून धोरणं व डावपेच ठरत असतात. जनप्रबोधनासाठी आकड्यांवर आधारित मुद्दे ठेवलेत तर जनजागृती मजबूतपणे होते. वैदिकी-ब्राह्मणांच्या नादी लागलेल्या ओबीसी जाती व चर्मकार, वाल्मिकीसारख्या अनेक दलित जातींना जेव्हा आकडेवारीच्या आधारे कळेल की, आपल्याला देशभक्ती शिकविणार्याा वैदिकीब्राह्मणांमध्ये एकही शिपाई सीमेवर शहीद झालेला नाही, आपल्याला स्वच्छता शिकविणार्याह वैदिकी ब्राह्मणांमध्ये एकही सफाइ कर्मचारी नाही, आपल्याला मेक ईन इंडिया शिकविणार्यां वैदिकीब्राह्मणांध्ये एकही व्यक्ती सुतारकाम, लोहारकाम, विणकाम यासारखी कलाकुसरीची कामे करीत नाही. देशाची सेवा करण्याची शिकवण देणार्याम वैदिकीब्राह्मणांमध्ये एकही व्यक्ती धोबी, नाभिक सारखी सेवेची कामे करीत नाही.अशी आकडेवारी अधिकृतपणे कागदावर येताच या देशाच्या प्रबोधनाचीदिशाच बदलून जाईल. शूद्रादिअतिशूद्रांच्या श्रमातून निर्माण होणारी संपत्ती बँकेत ठेवली जाते व देशाच्या विकासासाठी खर्च केली जाते. मात्र देशाच्या बँका लूटून परदेशात पळून जाणारे सर्वच्यासर्व लुटारू हे वैदिकी-ब्राह्मणच आहेत व त्यांनीच या देशाची अर्थव्यवस्था रसातळाला नेली आहे, हे जर अधिकृतपणे कागदावरच्या आकडेवारीनिशी सिद्ध झाले तर, या देशाच्या जन-धृवीकरणाची दिशाच बदलून जाईल.म्हणून दर दहा वर्षांनी होणार्यार राष्ट्रीय जनगणनेत जातनिहायच जनगणना झालीपाहिजे, ती जर 20121 साली होणार नसेल तर तेथेही बहिष्काराचे शस्त्र उगारले पाहिजे. आणखी एक बोर्ड घराच्या दरवाज्यावर लावला पाहिजेः- “जनगणना करायला आलेल्या कर्मचारी-अधिकार्यां नानम्र विनंतीः- आपल्याकडील जनगणना फॉर्ममध्ये प्रत्येक व्यक्तीची जात-पोटजात नोंद करणारा कॉलम असेल तरच आमच्या घरातून आपणास सहकार्य मिळेल, प्रत्येक व्यक्तीची जात-पोटजात नोंद करणारा कॉलम नसेल तर आमच्या घरातून जनगणनेसाठी कोणतेही सहकार्य मिळणार नाही.’’ अशा प्रकारचे दोन बोर्ड मोठ्या प्रमाणात लावलेत तर जात्यंतक क्रांतीच्या दिशेने तुम्ही निश्‍चितच मजबूतपणे चालणे सुरू केले आहे, असे समाजावे. यावरची पुढील चर्चा व प्रश्‍नोत्तरे पुढच्या बहुजननामा-99 मध्ये करू या! तोवर जयजोती, जयभीम, सत्य की जय हो!
प्रा. श्रावण देवरे