Breaking News

भिंगारनाला आणि नागरदेवळे हद्दीत घातक शीतपेये? नागरिकांमध्ये घबराट


भिंगार प्रतिनिधी
येथील भिंगार नाला परिसर आणि पंपिंग स्टेशन रस्त्यालगतच्या ओढ्याजवळ कोणीतरी बेजाबदार अज्ञात व्यापाऱ्याने सीलबंद शीतपेयांच्या बाटल्यांचे काही पॅकेजेस फेकून दिले आहेत. याठिकाणी शीतपेयांच्या बाटल्यांचा खच पडला आहे. त्यामुळे आधीच कचऱ्याचा प्रश् ऐरणीवर असताना दोन्ही नाल्यांच्या परिसरात शीतपेयांच्या बाटल्यांच्या टाकण्यात आल्यामुळे लहान मुले या बाटल्या नेऊन त्यांना काही अपाय तर होणार नाही ना, अशी नागरिकांमध्ये भिती व्यक्त होत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि  नागरदेवळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत या शीतपेयांच्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे नगर आणि भिंगारच्या व्यापाऱ्यांपैकी नक्की कोणी हे कृत्य केले, याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहे. भिंगारमध्ये आधीच कचऱ्याची समस्या नागरिकांच्या माथी असतांना भिंगार आणि नागरदेवाले परिसरातील ओढ्यांमध्ये कोणी तरी शीतपेयांच्या बाटल्या आणून टाकल्या. या बाटल्यांवर 'एक्सपायरी डेट' आहे की नाही, बाटल्यांतील ही शीतपेये अल्पवयीन मुले किंवा मोकाट जनावरांच्या संपर्कात आली आणि त्यातून संबंधितांना काही त्रास झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला  जात आहे. दरम्यान, कॅंटोन्मेंट बोर्ड आणि नागरदेवळे ग्रामपंचायत प्रशासनाने या लक्ष घालून स्वच्छता करावी, अशी मागणी भिंगारकर आणि
नागरदेवळे ग्रामस्थांमधून केली जात होत आहे