Breaking News

शाखा व्यवस्थापकाचा अनागोंदी कारभार

बेलापूर/प्रतिनिधी : उंदिरगाव ग्रामस्थांनी तेथील आय.डी.बी.आय.बँक शाखेतील व्यवस्थापकाच्या विरोधात हकालपट्टीचा ठराव ग्रामसभेत घेतला.
सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगावच्या आजूबाजूची अनेक गावे  एडीसीसी बँक, पतसंस्था असून आयडीबीआय बँकेची शाखा आहे. बँकेचे व्यवस्थापक वक्ते यांच्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून ते खातेदारांना नीट वागणूक देत नाही. अडाणी खातेदारांना उडवाउडवीची उत्तरे देतात, तसेच ग्रामीण खातेदारांच्या काही अडचणी असतील तर व्यवस्थित मार्गदर्शन करीत नाही. तसेच महिला खातेदारांना दमबाजी करून संपूर्ण पेमेंट हे सुट्या नाण्याच्या रुपात दिले जाते. तसेच कार्यक्षेत्राबाहेरील वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले आहे. व्यवस्थापकाच्या अशा व्यवहारामुळे उंदिरगावच्या नागरिकांनी कंटाळून ग्रामसभेत त्यांच्या विरोधात विषय ठराव  नं.18/1 घेऊन श्रीरामपूरच्या मुख्य कार्यालयाला सर्व संमत ठरावाची प्रत देऊन बँकेचे व्यवस्थापक वक्ते यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यांची हकालपट्टी न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यात नमूद केले आहे.
चौकट
कमिशनखोरीची
 सर्वत्र चर्चा
येथील आयडीबीआय बँकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात चिल्लर कोठून येते? आणि व्यवस्थापक ती खातेदारांना बळजबरीने का देतात? याचा शोध घेणे आवश्यक आहे, चिल्लर स्वीकारण्याच्या बदल्यात कमिशनखोरीची चर्चा होताना दिसत आहे.