Breaking News

‘जिद्द, चिकाटी असेल तर यश निश्‍चित : राशीनकर

चांदे/ प्रतिनिधी : “विद्यार्थ्यांच्या अंगी जिद्द, चिकाटी व परिश्रम करण्याची तयारी असेल तर त्यांना निश्‍चित यश मिळते’’, असे प्रतिपादन मुळा कारखाना येथील मुख्याध्यापक मोहनराव राशीनकर यांनी केले
चांदा येथील ज्ञानदीप क्लासेस गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी सातारा येथील सैनिकी स्कूल परीक्षेत पात्र ठरलेल्या ओमकार संजय जावळे व प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेले चैतन्य बाळासाहेब जावळे तसेच आर्मी भरतीसाठी पात्र ठरलेले जगन्नाथ चांगुलपाई, अक्षय बोरूडे, भागवत वाकडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब जावळे, केंद्रप्रमुख संतोष भोपे,  सुभाष शिंदे, सोमनाथ भालके, शहाजी धुमाळ, संजू दहातोंडे, रवींद्र जावळे, सोमेश्‍वर देवा, सुनील शिंदे, भास्कर मरकड आदी उपस्थित होते.
याप्रसंगी किरण जावळे, गणपत पुंड, संभाजी गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक जावळे, संतोष भालके, सोमनाथ भालके, बाळासाहेब जावळे (पंचवटी), प्रदीप चौरे उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले. ‘ज्ञानदीप’चे संतोष जावळे यांनी आभार मानले.