Breaking News

गावाचा चेहरामोहरा आम्ही बदलणार : सुनीता गडाख

चांदे/ प्रतिनिधी : “नेवासा तालुक्यातील चांदा गावचा देखील विकास आता आम्हाला करायचा आहे, तालुक्यातील गावाप्रमाणेच या गावचा देखील विकासकामांमुळे आम्ही चेहरा मोहरा बदलू’’, असे मत मा. प. सभापती सुनीता गडाख यांनी दत्तमंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या, “नामदार प्रशांत गडाख व मी एकत्रित बसून तालुक्यातील इतर गावांबरोबरच चांदा गावच्या विकासा बाबत विचार विनिमय करत असतो. चांदा गावच्या विकास कामासाठी पाहिजे तेवढा निधी आपण उभा करू, नवीन काही विकासाची कामे असल्यास ते सुचवा.’’ तसेच ह.भ.प. रोहिदास महाराज व आडभाई महाराज यांचा देखील आपल्याला आशीर्वाद असून साधुसंतांचे आशीर्वाद फार महत्वाचे असतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, मा. सभापती कल्पना पंडित, राजनंदिनी मंडलिक, जि.प. सदस्या सविता अडसुरे, पं.स. सदस्या पार्वती जावळे, चांदा ग्रामपंचायत सरपंच अरुणा थोरात हे उपस्थित होते. मा.सभापती कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी ‘मुळा’चे संचालक बाबूराव चौधरी, ‘ज्ञानेश्‍वर’चे संचालक मोहन भगत, मुळा बँक व्हा.चेअरमन प्रकाश भालके, ज्ञानदेव दहातोंडे, मुकुंदपूरचे सरपंच कांगुणे, घोडेगावचे बाळासाहेब सोनवणे, संजय भगत, सुदाम जावळे, चंद्रकांत जावळे, ज्ञानदेव दहातोंडे, रावसाहेब दहातोंडे, अ‍ॅड. समीर शेख, शिवाजी चौधरी, सुभाष शिंदे, रवींद्र जावळे, चांगदेव दहातोंडे, अमित रासने, सोमनाथ भालके, बाळासाहेब जावळे, शिवाजी दहातोंडे, बाळासाहेब डागवले, सचिन जावळे, मुक्तार शेख, अकील शेख, विजय रक्ताटे, बाबासाहेब आल्हाट, उद्धव सोनकर, सुभाष कर्डिले, मच्छिंद्र दहातोंडे, चांगदेव पुड, संजय दहातोंडे, संभाजी चौधरी, सतीश गाढवे, सर्जेराव थोरात व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. सूत्रसंचालन नवनाथ हराळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब जावळे यांनी केले.