Breaking News

मधुमक्षिका पालन ग्रामीण भागाला वरदान

निघोज/प्रतिनिधी : “रेशीम उद्योग व मधुमक्षिका पालन या उद्योगाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवता येतो, या उद्योगाला विद्यार्थ्यांनी व्यवसाय म्हणून स्वीकारले तर हा उद्योग ग्रामीण भागासाठी वरदान ठरणारा असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राणीशास्त्रानंतरच्या विविध संधी आहे’’, असे प्रतिपादन डॉ. एम.आर.खान यांनी केले.
येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि प्राणीशास्त्र विभाग आयोजित रेशीम उद्योग व मधुमक्षिका पालन या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी राधाबाई काळे महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. एम. आर. खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले, “रेशीम उद्योग व मधमाशी पालन हा शेतीला परस्परपूरक व्यवसाय व भारतातील महत्वाचा व्यवसाय आहे. रेशीम उत्पादन वाढण्यासाठी विद्यार्थ्यांनी या व्यवसायात स्वत:ला झोकून दिले तर मोठ्या प्रमाणात रोजगार वाढून शेतीचा विकास अधिक चांगल्या प्रकारे साध्य होईल.’’
कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. श्यामराव रोकडे, प्राणीशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. पोपट पठारे, डॉ. गोविंद देशमुख, प्रा.सचिन निघुट, प्रा.विशाल रोकडे, प्रा.मनीषा गाडीलकर, प्रा.प्रवीण जाधव, प्रा.राम खोडदे, प्रा.आबा कवडे, प्रा.अक्षय अडसूळ, प्रा.स्वाती मोरे, प्रा.आनंद पाटेकर, प्रा. शहाजी पांढरे, प्रा.सचिन लंके, प्रा.सोनाली बेलोटे, प्रा.पोपट सुंबरे, प्रा.नीलिमा घुले, प्रा.संगीता मांडगे, प्रा.सुरेश गाडीलकर, प्रा.अंजली मेहेर, प्रा.दीपाली जगदाळे, प्रा.प्रतिभा शेळके, प्रा.अनुजा भांबरे, प्रा.राणी ढगे, प्रा.जनाबाई घेमुड, केशर झावरे, प्रा. विशाल चव्हाण, प्रा. प्रीती कार्ले, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ घोगरे, संदीप लंके आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. पोपटराव पठारे यांनी यांनी केले तर आभार प्राध्यापक सचिन निघुट यांनी मांडले.