Breaking News

कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयात उद्यान विभागाच नाही? प्रशासनाच्या उदासिनतेमुळे छत्रपती उद्यानाची दुरवस्था


विनय देवतरसेभिंगार
अहमदनगरहून भिंगारमध्ये प्रवेश करताना छावणी परिषदेच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला नगरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला नजरेस पडतो, ते पाहून नजरेस ऐतिहासिक वास्तू पाहिल्याचा आनंद होतो. पुढे जाताना भिंगार नाला क्रॉस करून भिंगार गावात प्रवेश करताना भिंगार अर्बन बँकेच्या अलीकडे डाव्या हाताला भिंगार छावणी परीषद श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अशा नावाची पाटी नजरेस पडते, तिकडे पाहिले असता त्या उद्यानाची कंपाऊंड जाळी तुटलेली आणि भकास असे मोठे पटांगण नजरेस पडते. या उद्यानाची दुरवस्था पाहून कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात उद्यान विभागच अस्तित्वात नाही की काय, असा प्रश्न पडतो. 
या उद्यानाचा इतिहास पाहिला तर या उद्यानाचे   उदघाटन  दि. १७ फेब्रुवारी १९६४ साली त्याकाळचे माजी ब्रिगेडिअर हर मंदल सिंह, ऑफिसर कमांडिंग स्टेशन, यांच्या हस्ते झाले. तत्कालीन  व्हाईस प्रेसिडेंट मिश्रिलाल भंडारी, डॉ. कुलकर्णी, श्रीमती अनिता कुलकर्णी, व्ही. एल. ॲबट, रघुविर सिंह, एम. के. देवतरसे, जे. पी. पुलेलू आणि सीईओ भट्टी आणि त्यावेळचे कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य यांच्या उपस्थित होते. त्या काळातील उद्यान म्हणजे छावणी परिषदेचे नाक   शान असे होते. त्यानंतर म्हणजे सहा वर्षानंतर येथील १९७० झाली मेजर जनरल . एस. वैद्य, प्रेसिडेंट कॅन्टोन्मेंट बोर्ड, व्हाईस प्रेसिडेंट प्रभाकर भंडारी, इतर कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य हिरानंद मखिजा, व्ही.  बी. सपकाळ, आर. के. भोसले, व्ही. एल. ॲबट, नाथ राऊत, डी. सी. धिवर यांच्या उपस्थितीत यास उद्यानाचा उदघाटन सोहळा पार पडला होता. मात्र ५६ वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेल्या या उद्यानाची निर्मिती करण्यामागे कॅंटोन्मेंट बोर्डाचा निश्चितच चांगला हेतू असावा. भिंगार छावणी परिषद हद्दीतील नागरिकांना विरंगुळा म्हणून  फिरण्यासाठी मनोरंजन होऊन मानसिक त्रास कमी व्हावा निवांत बसण्यासाठी याचा उपयोग व्हावा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी याचा उपयोग व्हावा, या  चांगल्या हेतुकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष झालेले दिसत आहे. या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाची अवस्था फार बिकट अडचणीची झाली आहे. त्या शेजारीच काळा मारुती मंदिर, कॅन्टोनमेंट बोर्ड मंगल कार्यालय, कॅन्टोन्मेंट लॉन्स अशी वर्दळीची ठिकाणी असून मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारा भाविक भक्त लग्न-समारंभात इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येणारा वर्ग यांची कायम वर्दळ असते या उद्यानाची कंपाऊंड जाळी तुटून गेलेल्या अवस्थेत आहे. कंपाउंडचे लोखंडी पोल गायब झालेले दिसत असून गार्डनचे गेट बंद अवस्थेत कुलूप लावलेले असून नसल्यासारखे दिसते. उद्यानात हिरवळ नाही. लहान मुलांसाठी खेळाचे साहित्य नाही. या उद्यानात उन्हामुळे मोकाट जनावरांचे वास्तव्य असते. फक्त दोन्ही बाजूंच्या पाटीवरून उद्यानाचे अस्तित्व कळते. त्यामुळे हे उद्यान फक्त नावा करता शो करता आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे.
कॅंटोन्मेंट बोर्ड नाचते कागदी घोडे?
श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान  असे नाव पाहिले वाचले तरी अभिमानाने गर्वाने मान उंचावते. मात्र उद्यानाची अवस्था पाहिली तर उंचावलेली मान शरमेने खाली घालण्याची वेळ येते. कॅन्टोन्मेंट बोर्डाला उत्पन्नाचे साधन म्हणजे वाहन टोल टॅक्स / वाहन इंट्री टॅक्स, व्यापारी गाळे भाड्याचे उत्पन्न, कॅन्टोन्मेंट हद्दीतील घरांची घरपट्टी वसुली इतर टॅक्सेस केंद्र सरकारकडून येणारा निधी इतके सर्व असूनही तिकडे दुर्लक्ष का, असा सामान्य भिंगारच्या नागरिकांमधून उपस्थित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या नावावर मेन्टेन्स खर्च, कर्मचारी नेमणूक होतच नाही का, झाली तर फक्त  कागदी घोडे नाचवले जात आहेत का, असा प्रश्न येथील नागरिकांना भेडसावत आहे.