Breaking News

अल्पवयीन मुलीला पळविणारा जेरबंद


अहमदनगर / प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या बावीस वर्षीय आरोपीला पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीसह अटक केली. सनी सुभाष राजभोज असे सदरील आरोपीचे नाव असून दि. २२ एप्रिल २०१८ रोजी त्याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते.  दोघे हल्ली नाशिक जिल्ह्यातील घाटोळे मळा, कामगार नगर, सातपूर रोड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत तपासकामी लोणी पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी प्रतिबंध कक्ष शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या शाखेचे पो. नि. अरुण परदेशी यांच्या पथकातील पोलिसांनी गुप्तदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे राहत असलेल्या परिसरात जाऊन या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. कांबळे, महिला पोलीस नाईक, रुपाली लोहाळे आदींनी भाग घेतला.