Breaking News

पतीच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या संगमनेर/प्रतिनिधी
 पतीने पत्नीस माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावून तिचा वेळोवेळी शारीरिक, मानसिक छळ व शिवीगाळ केल्याने त्यास कंटाळून पत्नीने नांदूर गावाच्या शिवारात विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील विमल चिमाजी मोरे (वय ३२) या विवाहितेस तिच्या पतीने गाय घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक छळ करून वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ केली. नांदूर गावाच्या शिवारातील विहिरीत विवाहितेने उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे व सहकारी पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला. विमल मोरे यांचा भाऊ सोमनाथ भिकाजी गुळवे (रा. जोर्वे वय २८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिमाजी शिवराम मोरे याच्याविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे हे करीत आहे.