Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार वावरथ जांभळी येथील प्रकार


राहुरी/ शहर प्रतिनिधी ः
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील वावरथ जांभळी येथे घडली. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर बाचकर याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
         ही अल्पवयीन मुलगी वावरथ जांभळी येथे राहते. तिने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साधारण दोन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्‍वर बाचकर या एका शेतात काम करणार्‍याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने दिली.
      या प्रकारानंतर दोन महिन्यांनी संबंधित मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. याबाबत मुलीने आईला सांगितले. तेव्हा तिच्या आईने तिला बारागाव नांदूर येथील शासकीय रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी या मुलीची तपासणी करुन ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.
मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत विचारणा केली असता दोन महिन्यांपूर्वी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. या मुलीचा गर्भपात करण्यासाठी तिच्या आई वडिलांनी तिला जिल्हा रूग्णालयात नेले. तेव्हा याबाबत पोलिसांत तक्रार करावी लागेल, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
यानंतर या मुलीला चाईल्ड लाईन या संस्थेकडे नेण्यात आले. त्यांनीही याबाबत पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितले. 25 फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्‍वर बाचकर या तरूणाविरोधात राहुरी पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.