Breaking News

महापोर्टल बंद करण्याचा निर्णय स्वागतार्ह : गुंड

कर्जत/प्रतिनिधी : “महापोर्टल हे सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची फसवणूक व दिशाभूल करत होते. महापोर्टलमुळे ‘त्या’ सरकारबाबत आणि सरकारच्या धोरणाबाबत कमालीचा अविश्‍वास निर्माण झाला होता. त्यामुळे हे पोर्टल बंद होणे स्वागतार्ह बाब आहे’’,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ओंकार गुंड यांनी दिली.
महापोर्टल बंद करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली. त्याचा पाठपुरावा केला, त्याचे आता फळ मिळाल्याचा विद्यार्थ्यांना आनंद आहे. येणार्‍या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना सतत विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून काम करेल व त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ओंकार गुंड यांनी सांगितले.