Breaking News

कुत्र्याला हाड म्हटल्याने बेदम मारहाण


अहमदनगर / प्रतिनिधी
कुत्र्याला हाड म्हटल्याचा राग आल्याने शेजारी राहत असलेल्या टोळक्याने तिघांना लोखंडी कुदळ आणि गजाने बेदम मारहाण केली तर ही मारहाण सोडविण्यासाठी आलेल्या चौघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. नगर तालुक्यातील ससेवाडी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी ज्ञानदेव शंकर ससे, कारभारी ज्ञानदेव ससे, रोहिदास ज्ञानदेव ससे, देवीदास ज्ञानदेव ससे आदींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेतात काम करत असतांना ज्ञानदेव ससे यांच्या शेतात कुत्रे आल्याने त्यांनी हाड म्हटल्याने गैरसमज झाला आणि त्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मारहाणीत तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार थोरवे पुढील तपास करीत आहेत.