Breaking News

मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस आग्रही ः बाळासाहेब थोरात


संगमनेर : आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याचे विधेयकात रुपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. आमचे सरकार कोर्टात टिकेल असे ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मुस्लिमांना आरक्षण देणारच. हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विधान परिषदेत नवाब मलिक यांनी मुस्लीम आरक्षणाबाबत आघाडी सरकारची सकारात्मक भूमिका मांडली. तीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, असे थोरात यांनी सांगितले. राज्यात आघाडी सरकार असताना या पूर्वीच मुस्लीम समाजाला सरकारी नोकर्‍या व शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.