Breaking News

साकुरीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार घराशेजारीच राहणार्‍याचे कृत्य


राहाता/ प्रतिनिधी ः 
 सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर राहाता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
  तालुक्यातील साकुरी गावच्या शिवावर असलेल्या एका बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला आहे. पीडित मुलीच्या आईने राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी (दि.28) रोजी दुपारी एकच्या सुमारास माझी सात वर्षाची मुलगी व लहान मुलगा यांना घरात झोपवून घराची बाहेरून कडी लावून घराचेबाहेर धुणेभांड्याच्या कामासाठी खाली गेले होत.
धुणीभांड्याचे काम आवरून घरी दुपारी दोनच्या सुमारास आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा वाजवला असता घराच्या आतून मुलीचा रडण्याचा व शेजारीच राहणार्‍या एका व्यक्तीचा आवाज आला. यानंतर दरवाजा जोरात वाजवल्यानंतर मुलीने दरवाजा उघडला. तेथे शेजारी राहणारा एक जण बसलेला होता. यावेळी मुलगी रडत होती. तिला रडण्याचे कारण विचारले असता या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर घरात बसलेला तो माणूस घरातून पळून गेला. आमचा आरडाओरड ऐकून कॉलनीतील लोक जमा झाले. याप्रकरणी राहाता पोलिसांत या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये करत आहेत.