Breaking News

संशोधनामध्ये नावीन्यतेला महत्त्व असते


पारनेर/ प्रतिनिधी : “पेटंट मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक असून संशोधनामध्ये नाविन्यतेला प्रचंड वाव असायला हवा. आपण जे संशोधन करत आहोत ते इतरांपेक्षा नेहमी वेगळे असायला हवे. एखादा विषय ज्या वेळेस आपण निवडतो तेव्हा त्या विषयाच्या अनेक बाजूंनी विचार करत आपण त्या विषयाच्या मुळापर्यंत जायला हवे.  पेटंट हे कोणताही व्यक्ती मिळवू शकतो फक्त ते मिळविण्यासाठी आपल्या संशोधनामध्ये, अभ्यासामध्ये नाविन्यता असावी’’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी केले.
येथील न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयांतर्गत गुणवत्ता कक्षाच्या (आय.क्यू.ए.सी.) वतीने पेटंट कसे मिळवायचे? या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. लावरे बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पेटंट संदर्भातील सर्व कायदे, सर्व अटी, नियम या विषयी सविस्तर विचारमंथन केले. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना सविस्तर उत्तरे दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे सदस्य डॉ.विजयकुमार राऊत, प्रा.वीरेंद्र धनशेट्टी, प्रा. अशोक मोरे, प्रा. प्रदीप मुटकुळे, डॉ. सुखदेव कदम, कार्यालयीन अधीक्षक सुनील चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार राऊत यांनी केले. आभार डॉ. दिलीप ठुबे यांनी मानले.