Breaking News

स्वच्छतेसाठी उचललेले प्रत्येक पाऊल समाजहितासाठी : पवार

अहमदनगर / प्रतिनिधी :
प्रत्येक व्यक्तीने आपली नोकरी आणि व्यवसाय सांभाळून समाजाबद्दल आपले काही तरी देणे लागते, या भावनेतून काम केले पाहिजे. स्वच्छतेसाठी उचललेले प्रत्येक पाऊल हे समाजहितासाठी असते. आपल्या देशासमोर स्वच्छतेचा त्याची जनजागृतीचा मोठा प्रश्न आहे. त्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीने आपापल्यापरीने योग्य तो वेळ देऊन स्वच्छतेसाठी काम केले पाहिजे. त्यामाध्यमातून नागरिकांचे आरोग्य निरोगी सदृढ राहण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले. पंजाब अँण्ड सिंध बॅकेच्या अधिकारी आणि कर्मचारी नगर शहरात प्रत्येक गुरुवारी चौकाचौकात शाळा-महविद्यालयात जाऊन स्वच्छता आणि जनजागृतीचा संदेश देण्याचे काम करत आहेत. याबद्दल पदमश्री पवार यांनी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतूक केले. स्वच्छता अभियान फलकाचे अनावरण पवार यांनी केले. यावेळी बँकेचे वरिष्ठ शाखा अधिकारी संतोष चौधरी, कमल खिलवाणी, नितीन राठोड, किशोर वेरुळीकर, पुजा शारदा पवार, पुनम नारनवरे, अभिजीत भालेराव आदी कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.