Breaking News

निलेश राणेंची बाळासाहेब ठाकरेंवर घणाघाती टीका, मांडवली केल्याचा आरोप


मुंबई, 28  : ’वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता? 1947 साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही,’ असं म्हणत शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं केलेल्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे पुढे सरसावले आहेत.

’स्व. बाळासाहेब होते का स्वातंत्र्य लढ्यात? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत स्व. इंदिरा गांधीजींशी बाळासाहेबांनी मांडवली केली. तो इतिहास लोकं विसरलेली नाही,’ असं म्हणत निलेश राणे यांनी थेट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देताना थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने आता शिवसेनाही आक्रमक होण्याची शक्यता आहे.

स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात??? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते??? अटक होऊ नये म्हणून आणी बाणीत स्व. इंदिरा गांधीजीशी मांडवल्ली केली बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही.

’काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरदार पटेल यांनी दोन वेळा बंदी आणली. दोन्ही वेळेला ‘बंदी’ उठवताना सरदारांनी एक अट कायम ठेवली ती म्हणजे, “तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज आहे. तो मानावाच लागेल.’’ ही अट गोळवलकर गुरुजींनी मान्य केली, पण 2002 पर्यंत संघाने हा शब्द पाळला नाही, असे ‘रेकॉर्ड’ सांगतेय. राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे देशद्रोही ठरवले जातात. स्वतःस राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱया संघटना 2002 पर्यंत ‘राष्ट्रध्वज’ फडकवायला तयार नव्हत्या. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे, पण भगव्याच्या बरोबरीने ‘तिरंगा’ही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद आहे,’ असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात आली होती.