Breaking News


अहमदनगर / प्रतिनिधी
शहरातील अनेक मंदिरे आणि देवस्थाने ही पुरातन आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास आख्यायिकाही आहेत. परंतु याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन वस्तूनिष्ठ विश्वसनिय साधनांचे आधारे प्रा. नवनाथ वाव्हाळ यांनी शोध निबंधद्वारे जगासमोर मांडला आहे. त्यामुळे श्री विशाल गणेश मंदिराचा इतिहास त्याची सत्यता या शोध निबंधाद्वारे जगासमोर आल्यामुळे एक विश्वसनिय दस्तावेजच तयार झाला आहे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश मंदिरचे अध्यक्ष ॅड. अभय आगरकर यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शैक्षणिक़ संस्थेतील इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हाळ यांनी श्री विशाल गणेश मंदिराचा शोध निबंध सादर केल्याबद्दल देवस्थानच्यावतीने त्यांचा अध्यक्ष ॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, चंद्रक़ांत फुलारी, रंगनाथ फुलसौंदर, हरिश्चंद्र गिरमे, अमित आगरकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले तर आभार पंडितराव खरपुडे यांनी मानले.