Breaking News

शासकीय वसतिगृहे शैक्षणिक परिवर्तनाची केंद्रे व्हावी : प्रा. खरात

संगमनेर/ प्रतिनिधी : “शिक्षण हा समाज परिवर्तनाचा मुख्य घटक असून प्रत्येकानेच शिक्षित झाले पाहिजे. सध्या शिक्षणाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहे याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करुन घेतला पाहिजे. शासकीय वसतीगृहे ही सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाची केंद्रे व्हावी’’, असे प्रतिपादन आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक प्रतिनिधी रंगनाथ पोंधे हे होते तर व्यासपीठावर डॉ. अरुण इथापे, संजय जगताप, मंगल येलमामे, अंजली गोरे आदी उपस्थित होते.
यावेळी प्राध्यापक खरात म्हणाले, “पालकांनी आपल्या पाल्याला वेळोवेळी भेटून त्याच्या अभ्यासाची चौकशी केली पाहिजे. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. गीत, गायन, नृत्य, पथनाट्य सादरीकरणातून कला आविष्कारांचे उत्तम दर्शन घडते.’’ उत्साही वातावरणात वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळावा झाल्याबद्दल बाबा खरात यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी संजय जगताप, रंगनाथ पोंधे, कुसूम पथवे, डॉ. इथापे, जालिंदर आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक वसतिगृहाच्या अधीक्षिका मंगल येलमागे यांनी केले. सूत्रसंचालन अश्‍विनी खरात व कुमारी वलवे यांनी केले. आभार अंजली गोरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.