Breaking News

थोलार हॉस्पिटलजवळील अतिक्रमणावर हातोडा


अहमदनगर / प्रतिनिधी
तारकपूर बसस्थानकासमोरील थोलार हॉस्पिटलच्या मागील बाजूला असलेल्या वहिवाटीच्या जागेत भिंतीचे अतिक्रमण मनपा अतिक्रमणविरोधी पथकाच्यावतीने पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकाला एका महिलेने विरोध केला. त्या विरोधाला जुमानता या पथकाने पोलिसांच्या बंदोबस्तात ही मोहीम पार पाडली.