Breaking News

कट्टर नक्षलवाद्याचे आत्मसमर्पणगडचिरोली:
 अनेक लहानमोठ्या नक्षली कारवाईत सहभागी असलेल्या एका कट्टर नक्षलवाद्याने शुक्रवारी दुपारी धानोरा तालुक्यातील सातगाव येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.  विलास कोला (वय-४४) असे या नक्षलवादाचे नाव आहे. यावेळेस त्याने आपली एके ४७ ही रायफलही पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे अति. पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या समक्ष हे आत्मसमर्पण करण्यात आले.
 नक्षलवादाला अस्थिर जीवनाला कंटाळलेल्या अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग धरल्याचे अलीकडच्या काळात दिसू लागले आहे. याच मालिकेत शुक्रवारी विलास कोला याने नक्षलवादाचा मार्ग सोडून सामान्य जीवन जगण्याचा संकल्प केला. विलास कोला हा अनेक मोठ्या नक्षली कारवायांमध्ये सहभागी झाला होता. त्याला पकडून देण्यासाठी लाख ५० हजार रुपयांचे बक्षीसही सरकारने घोषित केले होते.