Breaking News

गंगापूरमध्ये क्रिकेटच्या वादातून हाणामारी


गंगापूर/प्रतिनिधी ः
गंगापूर येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले. रविवारी हा प्रकार घडला.
  गंगापूर येथील सोमाणी ग्राउंडवर रविवारी काही तरुण क्रिकेट खेळत होते. यादरम्यान अंपायरने नो बॉल दिल्याच्या कारणातून क्रिकेट खेळणार्‍या तरुणांच्या दोन गटात हाणामारी झाली. हाणामारीच्या घटनेत अंपायरसह तीनजण जखमी झाले. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंपायर नीलेश विनायक बागुल, विकी विनायक बागुल, अविनाश संजय खाजेकर, उबेद समीर शेख हे या हाणामारीत जखमी झाले. विकी बागूल यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.