Breaking News

आयसिस संशयावरुन कर्नाटक, तामिळनाडूत एनआयएचे छापे

नवी दिल्ली ः राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयसीसीशी निगडीत प्रकरणात सोमवारी सकाळी सुमारे 20 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. एनआयएने तामिळनाडू आणि कर्नाटकात ही कारवाई केली. सध्या या प्रकरणी अधिक माहिती समजू शकलेली नाही.  दरम्यान, मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये एनआयएच्या पथकाने तामिळनाडूत आयसिस मॉड्यूलवरुन 31 ऑक्टोबरला छापे मारले होते. त्रिची, नागपट्टिणम, कलापट्टिनम, कोईमतूर समवेत 6 ठिकाणांवर छापे टाकले होते. यात अनेक महत्वाचे दस्तावेज मिळाले होते. यादरम्यान एनआयएला लॅपटॉप आणि पेन ड्राईवही मिळाला होता. आयसिस मॉड्यूलवरुन एनआयएने 2018 मध्ये एफआयआर दाखल केला होता. कोईमतूर पोलिसांच्या एका विशेष तपास पथकाने सप्टेंबर 2018 मध्ये तामिळनाडूमध्ये एका आयसिस प्रेरित इस्लामिक समूहाच्या सात सदस्यांचा एक कट उधळवून लावला होता. यामध्ये हिंदू मुन्नानी नेता मूंकबिकाई मणी आणि शक्ती सेनाचा नेता अंबु मारी यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. तेव्हापासून एनआयए दक्षिण भारतात काम सक्रिय झाले असून माहिती गोळा करण्याचे त्यांचे काम सुरु आहे.  एनआयए संशयित कट्टरपंथी युवकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. वर्ष 2014 नंतर आतापर्यंत 127 आयसिस समर्थक लोकांना अटक केल्याचा दावा एनआयएने मागीलवर्षी केला होता. अटक केलेल्यांपैकी 33 जण तामिळनाडूतील आहेत.