Breaking News

तालूका दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : शिंदे


अहमदनगर / प्रतिनिधी :
भाजपचे माजी . शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या नगर तालूका दूध संघात सण २००६-०७ या काळात कोटी लाख रुपयांचा अपहार होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत. यामुळे हा दूध संघ डबघाईस आला असून प्रशासकाची कार्यवाही होऊन अवसायक नेमणूका झाल्यानंतर माजी . कर्डिले यांच्या आदेशाने या दूध संघाच्या संचालक मंडळाने पुढील पाच वर्षांत एक लाखापर्यंत दैनंदिन दूध संकलनाचा बोगस आराखडा अवसायक त्यांच्याकडे सादर करून त्यांच्यावर दबाव आणत तालुका दूध संघ पुनर्जीवन करण्यास त्यांना भाग पाडले, असा आरोप या दूध संघाचे कर्मचारी प्रतिनिधी तायगा शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले असून माजी . कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली असलेले या दूध संघाचे हे संचालक बरखास्त करा, अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात शिंदे यांनी म्हटले आहे, की तत्कालीन जिल्हा उपनिबंधक यांनी दूध संघाचे पुनर्जीवन होत नसल्याने आदीकारण देऊन दि. ३० सप्टेंबर २०१५ रोजीच्या आदेशाने संघाच्या पुनर्जीवनाचा हा प्रस्ताव साफपणे फेटाळला. मात्र तत्कालीन सहजिल्हा उपनिबंधक, मुंबई यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाने तोच बोगस प्रस्तावा मान्य करून तत्कालीन नाशिकचे जिल्हा उपनिबंधक यांच्यावर दबावाने दि. एप्रिल २०१६ रोजी प्रारूप मसुदा आदेश अटी आणि शर्तीसह पारित करून त्यावर भरपूर आक्षेप आणि हरकत नोंदविल्या गेल्याने तत्कालीन डीडीआर यांनी प्रारूप मसुदा आदेशातील सर्व अपहारकृत सदस्यांना पुनर्जीवन समितीतून कारण दाखवून डावलून दि. आक्टोबर २०१६ रोजी अटी आणि शर्तीसह अंतिम पुनर्जीवन आदेश पारित केला. त्यामध्ये या अपहारकृत सदस्यांना स्थान मिळाल्याने राजकीय तंत्राचा वापर करून यावर तत्कालीन निबंधक मुंबईचे संदीप आमने यांच्यासमोर अपील दाखल केले.
दरम्यान, सध्या पदावर असलेले संचालक मंडळ पुन्हा या दूध संघाची जागा विक्री निधीचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांची देणी देणार नाहीत. ३७ पैकी दूध संस्थांचा दूध पुरवठा होत असला तरी संचालक मंडळ सदस्यांचाच दूध पुरवठा होत नाही. त्यामुळे या संचालक मंडळाची हकलापट्टी करून बरखास्तीची आदेश होऊन दूध संघाचे संभाव्य नुकसान टाळून २७३ कर्मचाऱ्यांची देणी अदा करण्यात यावी.