Breaking News

चिथावणीखोर वारीस पठाणला आवरा

एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वक्तव्य पठाण यांनी एका सभेत केलं होतं. वादग्रस्त वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून राजकीय घडामोडींवर नेहमीच मत व्यक्त करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील ट्विट करत पठाण यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने ठिकठिकाणी जोरदार निदर्शने चालु केली असून. दोन्ही पक्षाने केलेल्या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात येत आहे एमआयएम या पक्षाचे राजकीय चारित्र्य सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिले आहे. जाहीरपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेणारा हा पक्ष असला तरी जेव्हा भाजप राजकीयदृष्ट्या अडचणीत येतो तेव्हा एमआयएम मदतीसाठी धावून येत असतो, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेचा ओवेसी यांनी तातडीने प्रतिवाद केला असला तरी वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर भूमिका घ्यायला त्यांना बरेच दिवस लागले. अशा राजकीय पानसुपारीच्या कार्यक्रमांमुळे शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करणार्‍या मुस्लिम महिलांच्या आंदोलनाला गालबोट लागते आहे, हेही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.
या देशात 100 कोटीहून अधिक हिंदू असल्यानेच देशात कुणालाही बोलण्याचा अधिकार आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिथावणीखोर वक्तव्य करणार्‍या वारीस पठाण यांना टोला लगावला आहे. एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. भाजप, शिवसेनेसह अन्य पक्षातील नेत्यांनी यावर टीका केली आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चिथावणीखोर वक्तव्यामुळे वारीस पठाण यांचा समाचार घेतलाच आहे तसेच भारत हा सहिष्णू देश आहे. हिंदू समाज हा सहिष्णू आहे. मात्र, हिंदू समाजाच्या सहिष्णूतेला जर हिंदू समाजाची दुर्बलता कुणी समजत असेल, तर तो त्यांचा मुर्खपणा ठरेल. त्यामुळे अशाप्रकारचं वक्तव्य या ठिकाणी खपवून घेतलं जाणार नाही हे पठाण यांनी लक्षात घ्यावं, असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान या वक्तव्याबद्दल वारिस पठाण यांनी माफी मागितली पाहिजे. तसेच राज्य सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींवर भारी आहोत हे लक्षात ठेवा, असं वक्तव्य पठाण यांनी एका सभेत केलं होतं. वादग्रस्त वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून राजकीय घडामोडींवर नेहमीच मत व्यक्त करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील ट्विट करत पठाण यांच्यावर टीका केली आहे. वारिस पठाण हे बेताल वक्तव्य करणारे गडी आहेत. तशी त्यांची ओळख असल्यानेच लोकांनी त्यांना बाजूला बसवले आहे, असं सांगत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी आमदार संतोष दानवे यांनी केली. संतोष दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपने ठिकठिकाणी जोरदार निदर्शने चालु केली असून. दोन्ही पक्षाने केलेल्या आंदोलनात वारिस पठाण यांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक दहनही करण्यात येत आहे
एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यासारखी लायकी नसलेली माणसे मोठा उपद्रव निर्माण करण्याची शक्यता निर्माण होते तेव्हा अशांना त्यांची लायकी दाखवून देण्याची आवश्यकता असते. एमआयएम या पक्षाचे मुंबईतील माजी आमदार वारिस पठाण यांची दखल त्याच कारणामुळे घेणे भाग पडत आहे. पेशाने वकील असलेले वारिस पठाण 2014 साली अपघाताने आमदार झाले आणि आमदार झालो म्हणजे आपल्याला सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा ठेका मिळाला, अशा तोर्‍यात ते मिरवू लागले. महाराष्ट्राच्या विधिमंडळात वंदे मातरम् म्हणण्यावरून जो गोंधळ घातला गेला होता त्यात हेच गृहस्थ आघाडीवर होते. अर्थात, यांचे खेळ अनेकदा मॅच फिक्सिंगसारखे असतात. त्यामुळे कुणालातरी फायदा मिळवून देण्यासाठी, आणि त्याद्वारे स्वत:चाही राजकीय लाभ करवून घेण्यासाठी त्यांचे उद्योग सुरू असतात. एमआयएम या महाराष्ट्रात नव्याने दाखल झालेल्या पक्षाने 2014 मध्ये विधानसभेला उमेदवारी देण्यासाठी हा हिरा हुडकून काढला. मुस्लिमबहुल असलेल्या भायखळा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सव्वादोन लाख मतदारांपैकी सव्वा लाख मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी केवळ 25 हजार मते मिळवून पठाण आमदार झाले होते. अन्य चार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना वीस हजारांपासून 24 हजारांपर्यंत मते मिळाली होती. म्हणजे अपघाताने उमेदवारी मिळाली आणि पठाण अपघाताने निवडूनही आले. 2019च्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. परंतु माजी आमदार हे विशेषण मागे लागले असल्यामुळे देशभरात कुठेही उपद्रवमूल्य दाखवण्याचा परवानाच त्यांना मिळाला आहे. त्याच परवान्याचा वापर करून त्यांनी गेल्या आठवड्यात कर्नाटकातील गुलबर्गा येथे मआम्ही 15 कोटी 100 कोटींना भारी आहोत, असे विधान करून धार्मिक विद्वेषाला चिथावणी दिली.
अर्थात, कर्नाटकातील भाजप सरकारने त्यांच्यावर कारवाई केल्याचे अजून ऐकिवात नाही. पठाण यांचे वक्तव्य समाजमाध्यमांतून व्हायरल होत असतानाच बेंगळुरू येथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत एका मुलीने मपाकिस्तान झिंदाबादफच्या घोषणा दिल्या. या घटनांना निव्वळ योगायोग म्हणून सोडून दिले तर सामाजिक फसगत करून घेतल्यासारखे होईल. अशा अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने समोर येत आहेत, त्याला पार्श्‍वभूमी आहे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) विरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनांची. विद्यापीठांतील विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या आंदोलनांत देशभरातील प्रगतीशील विचाराच्या पक्ष, संघटना तसेच व्यक्तींचा सहभाग आहे. मुस्लिम समाजातील महिलांनी संविधान आणि तिरंगा हातात घेऊन अडीच महिन्यांपासून सत्याग्रह सुरू केला आहे. याठिकाणच्या आंदोलनांची शांतता भंग करण्याचे पुरस्कृत प्रयत्न अनेकदा झाले, परंतु सत्याग्रहींनी शांततेचे बोट सोडले नाही. सरकारने बेदखल केले तरी सर्वोच्च न्यायालयाला त्यांची दखल घ्यावी लागली. या आंदोलनांच्या निमित्ताने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरणाचे जोरदार प्रयत्न झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यात जराही कसर ठेवली नाही. त्यांना दिल्लीतील जनतेने साफ नाकारल्यानंतरही संबंधित घटकांनी प्रयत्न सोडलेले नाहीत. आपल्याकडून काही होत नाही तर मग त्यांच्यातीलच काही लोकांना हाताशी धरून काही साध्य करून घ्यावे, जेणेकरून हे वातावरण बिहार, पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीपर्यंत तापवत ठेवता येईल, असा साधा विचार यातून दिसतो आहे. त्यात पुन्हा महाराष्ट्रातील औरंगाबादसारख्या ध्रुवीकरण सहज शक्य असलेल्या शहराच्या महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे. एमआयएम या पक्षाचे राजकीय चारित्र्य सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिले आहे. जाहीरपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेणारा हा पक्ष असला तरी जेव्हा भाजप राजकीयदृष्ट्या अडचणीत येतो तेव्हा एमआयएम मदतीसाठी धावून येत असतो, हे आजवर अनेकदा दिसून आले आहे. पाकिस्तान झिंदाबादफच्या घोषणेचा ओवेसी यांनी तातडीने प्रतिवाद केला असला तरी वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर भूमिका घ्यायला त्यांना बरेच दिवस लागले. अशा राजकीय पानसुपारीच्या कार्यक्रमांमुळे शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करणार्‍या मुस्लिम महिलांच्या आंदोलनाला गालबोट लागते आहे, हेही लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.