Breaking News

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर एकमेव माध्यम : शिंदे


                                                                                                                                                                                                                         अहमदनगर / प्रतिनिधी :
सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सीसीटीव्हीच्या तंत्रज्ञानाद्वारे पोलीस यंत्रणेलाही गुन्ह्यांचा शोध घेताना घटनास्थळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून घडलेली घटना आणि आरोपी यांचा शोध घेण्यास तसेच तपास कामात मदत होते. त्यामुळेच पोलिस यंत्रणेनेही सर्व  कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या परिसरात सुरक्षा कवच निर्माण होते गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसतो त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊन गुन्हा घडलाच तर आरोपींचा शोध तातडीने घेण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाला सुरक्षेची हमी देण्यासह गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर एकमेव माध्यम आहे, असे प्रतिपादन डी. लीक कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक स्वप्नील शिंदे यांनी केले.
अहमदनगर जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरा आणि सिक्युरिटी सोलुशनच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिकांचा स्नेहमेळावा डी. लिंकम, इनफिल्ड सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल यश ग्रँड येथे संपन्न झाला. याप्रसंगी डी. लीक कंपनीचे राजकुमार मदान, घनश्याम साळवे, श्रेयस भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक इनफिल्डचे संचालक अल्ताफ शेख यांनी केले. वसीम सय्यद यांनी आभार मानले.