Breaking News

दारु प्यायला पैसे न दिल्याने मारहाण


अहमदनगर / प्रतिनिधी
दारू प्यायला पैसे दिल्याच्या रागातून एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या डोक्यात फरशी मारून त्याला दुखापत करण्यात आली. बुरूडगाव रोड परिसरातील गॅस गोडाऊनच्या पाठीमागे ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नितीन सुरेश तोरणे, रा. बुरूडगाव रोड, नगर, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीत संग्राम बाबुराव घोडके, वय ४२ हे जखमी झाले. नितीन तोरणे याने घोडके यांच्याकडे दारू प्यायला पैसे मागितले, मात्र तोरणे यांनी ते दिले नाही. त्यामुळे तोरणे याने घोडके यांना शिवीगाळ करून मारहाण सुरु केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक योगेश चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.