Breaking News

साईबाबा महाविद्यालयात वाद-विवाद स्पर्धा

शिर्डी /प्रतिनिधी : येथील साईबाबा संस्थानच्या साईबाबा महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या वतीने संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली मातृभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे की नाही?’ या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली.   
यावेळी प्राचार्य शिवगजे म्हणाले, “कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लवकर समजते. येथे मातृभाषेचा अर्थ मी मराठीच्या दृष्टीकोनाने बोलतो. वयाच्या तीन चार वर्षापर्यंत माणसाला शक्यतो केवळ आपली मातृभाषाच येत असते आणि त्यामुळे आपली विचार करण्याची क्षमता देखील मातृभाषेतच विकसित होते. परभाषेतील मजकूर डोळ्यापर्यंत, कानापर्यंत पोचतो. मातृभाषेतील बोलणे, लिखाण मनात, अंतर्मनात पोहोचते. मराठी माध्यमात कमी पाठांतर करूनही त्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात, सहज सुलभतेने व्यक्त करता येतात. मराठी माध्यम निवड महाराष्ट्रीय मुलांसाठी सर्वोत्तम, सुरक्षित, लाभदायक गुंतवणूक ठरते.’’ प्रा. मंदाकिनी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातृभाषेचे महत्व उदहारणासह पटवून दिले.
कार्यक्रमास अधीक्षक राजेंद्र कोते, मुख्याध्यापक गंगाधर वरघुडे, प्रा. मंदाकिनी सावंत, प्रा. वैशाली देशमुख, प्रा. शीतल धरम, प्रा. स्वप्नाली खांडरे, प्रा.नितीन पावसे, प्रा. सुनील कवडे, प्रा.दीपक पटारे, प्रा. अमोल कचरे, डॉ. गणेश भांड, प्रा.सरिता लावरे, डॉ.योगिता कोपटे, प्रा. नानासाहेब गुंजाळ, प्रा.सुनील गायकवाड, प्रा.सुनील पठारे, प्रा. नानासाहेब सदाफळ, प्रा. गणेश मगर, प्रा.प्रशांत हासे, प्रा.विकास भांड, दिनेश कानडे, ग्रंथपाल भाऊसाहेब शिंदे, मनोज बकरे, प्रशांत शेळके, रामनाथ कासार आणि महाविद्यालयीन कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते. प्रा.सुनील कांडेकर व प्रा.सरिता लावरे यांनी वाद-विवाद स्पर्धेचे परीक्षण केले.
गायत्री ठाकरे व प्रिया मते यांचा प्रथम क्रमांक, हिना अन्सारी व ऋषिकेश आबक यांचा द्वितीय क्रमांक व निशा जाधव  व दुर्गा गव्हाणे  यांचा तृतीय क्रमांक आला. विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.शिवाजी ढोकणे यांनी नियोजन केले. मराठी विभागप्रमुख डॉ.सुनीता वडीतके यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सोनाली हरदास यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष औताडे यांनी आभार मानले.