Breaking News

नियमित व्यायामाने रोग टाळणे शक्य : आ. जगताप


अहमदनगर / प्रतिनिधी
शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम. नियमित व्यायामामध्ये ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा. व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते. व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर उतारवयातही निरोगी ठेवण्यास मदत होते, असे प्रतिपादन . संग्राम जगताप यांनी केले.
उपनगरातील गावडेमळा येथील स्काय कोर्ट अपार्टमेंटमधील नूतन जीमचे उद्घाटनप्रसंगी . जगताप बोलत होते. यावेळी सभागृहनेते स्वप्नील शिंदे, नगरसेवक योगीराज गाडे, डॉ. विजय भंडारी, सुमित कुलकर्णी, अमित गटणे, विधीज्ञ प्रसन्न जोशी, सचिन जगताप, शाम सचदेव, जयेश सचदेव, अतुल जैन, सतीष विधाते, गणेश बर्वे, दीपंकर गटणे, शुभंकर गटणे, निलेश बुरा, सचिन अडगळा, सुरज कुर्लीये, दिपाली गटणे, भैय्या बॉक्सर, तबरेज शेख, गींनी सचदेव,  पूजा विधाते आदी उपस्थित होते.