Breaking News

कंपोस्ट खतामुळे बागही फुलेल : गाडे

 अहमदनगर / प्रतिनिधी
महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरभर स्वच्छता अभियान राबविले. यात प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रुपने मोठे सहकार्य मिळाल्याने आपल्या शहराचा भारतात १० वा क्रमांक आला. आता हीच स्वच्छता नागरिकांना कायम ठेवून आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. घरातील कचर्यापासून खत तयार करुन ते आपल्या परसबागेत टाकल्यास आपली बागही फुलवून येऊ शकते, असे प्रतिपादन नगरसेवक योगीराज गाडे यांनी केले.
प्रभाग क्रमांक चारमधील समतानगर येथे नगरसेवक गाडे यांच्या प्रयत्नातून घरच्याघरी ओल्या कचर्याचे खत कसे तयार करायचे, याविषयी स्वच्छता रक्षक कमिटीच्या सुधा खंडेलवाल यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत संध्या जाधव, एस. एस.सोनवणे, संध्या तिटकारे, दीपा घावटे, नंदीनी खिलारी, शारदा ठोंबरे, माधुरी गोधड, वासंती गायकवाड, निता घावटे, संगीता धामणे, मीना नरसाळे, निलिमा कुलकर्णी, सुनिता शिदोरे आदी उपस्थित होते. यावेळी सुधा खंडेलवाल यांनी या कंपोस्टिंगचे सुलभ तंत्राविषयी माहिती देतांना सांगितले, की एका ड्रमच्या तळाशी ड्रममध्ये जाळीची प्लेट
उलटी ठेवायांची, ड्रम टबमध्ये ठेवणे, तळाशी गवताची पाती, सुकी पाने टाकणे, त्यात ओला कचरा टाकणे, त्यात कंपोस्ट स्टार्टर मिसळा हे खत ते आठवड्यात तयार होईल, ते तुम्ही वापरु शकता. यात ओला कचरा म्हणजे फळांचा भाज्यांची साले, शिल्लक राहिलेले अन्न, चहाची पत्ती, कॉफीची पूड पुड, दही, नासलेले दूध, जॅम्स, जेली, अंड्याची टरफले, ब्रेडचे तुकडे, लॉनेच खराब गवत यापासूनही तुम्ही कंपोस्टिंग तयार करु शकता. त्यामुळे परिसरात कचराही होणार नाही आणि आपल्याला घराच्याघरी खत तयार होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या तिटकारे यांनी केले. यावेळी विजया लांडगे, योगीता बोरुडे, सुवर्णा बोरुडे आदिंसह, माधुरी गोधड, वासंती गायकवाड, निता घावटे, संगीता धामणे, मीना नरसाळे, निलिमा कुलकर्णी, सुनिता शिदोरे आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. निता घावटे यांनी आभार मानले.