Breaking News

बुरुडगावच्या उपसरपंचपदी दिलीप पाचारणे बिनविरोध


अहमदनगर / प्रतिनिधी
शहराजवळचे गाव म्हणून ओळखले जाणारे बुरुडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाचा खंडू काळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेवर दिलीप पाचारणे यांची सर्वसदस्यांच्या अनुमतीने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक हरिभाऊ येवले सिनारे यांनी पाहिले. यावेळी सरपंच अर्चना कुलट, सदस्य शालनबाई क्षेत्रे, अक्षय चव्हाण, ज्योती कर्डिले, शितल ढमढेरे आदी सदस्य उपस्थित होते.