Breaking News

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी ताब्यातकोळगाव/प्रतिनिधी 
 श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंपळगाव पिसा या ठिकाणी लाकडी काठीने मारहाण करून चाकूने भोकसून जिवंत मारल्याप्रकरणी फरार असलेला गिल्या उर्फ लंगड्या रमेश काळे याला चांदवड येथून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांत त्यास बेलवंडी पोलिस ठाण्यात हस्तांतरित केले.
 श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर पिंपळगाव पिसा येथे ४ जानेवारी रोजी हस्तीमल चाफ्या काळे (वय ७०) याला शेळी चोरी बाबत चर्चा करण्यासाठी आरोपी आलोशा रमेश काळे, रमेश मोतीलाल काळे, गिल्या रमेश काळे, कालकाबाई रमेश काळे, सतेस नाकवाशा भोसले, छत्तीस नाकवाशा भोसले, हुल्या पंडित्या भोसले यांनी बोलावून घेतले आणि चाकूने व लाकडी काठीने मारहाण करून त्याचा खून केला. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील आरोपी गिल्या उर्फ लंगड्या रमेश काळे यास बेलवंडी पोलिसांनी त्याचवेळी ताब्यात घेतले होते. गुन्ह्यामध्ये यापूर्वी आरोपी रमेश मोतीलाल काळे व कालकाबाई रमेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील फरार असलेला आरोपी गिल्या उर्फ लंगड्या रमेश काळे याला चांदवड येथे नाशिक ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली.