Breaking News

प्रवरा शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात चर्चासत्र

कोल्हार/ प्रतिनिधी : “येथील डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, कोल्हार, रसायनशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 व 15 फेब्रुवारीस ‘ग्रीन टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे’’, अशी माहिती प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी दिली.
चर्चासत्राच्या उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी. पी. बंडगर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील या प्रमुख अतिथी, अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.भास्करराव खर्डे पाटील, तसेच महासंचालक डॉ.वाय.एस.पी.थोरात, संचालक डॉ.हरिभाऊ आहेर, सहसचिव भारत घोगरे पाटील उपस्थित राहणार आहेत.
या चर्चासत्रात डॉ.बी.पी.बंडगर (सोलापूर), डॉ.किशोर चिखालिया (सूरत), डॉ. सुरेश गायकवाड, डॉ.एम.के.लांडे (औरंगाबाद), डॉ. सुरेश मांजरे (मुंबई), डॉ. प्रशांत अनभुले (कोल्हापूर), डॉ. गुरुमित वधवा (वाशी), डॉ.असलम शेख (अमेरिका), डॉ. सोमनाथ घोलप (सात्रळ), डॉ.एस.सी.कोंडा (कोपरगाव) आदी मार्गदर्शन करणार आहेत. या चर्चासत्रात प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. अर्चना विखे, डॉ. विनोद कडू व प्रा.अमोल खर्डे यांनी दिली.