Breaking News

हर्षदा आदमाने एमपीएससी उत्तीर्ण

राहुरी/शहर प्रतिनिधी : येथील अमन सोशल असोसिएशनच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथील हर्षदा आदमाने महाराष्ट्र शासनाच्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची कनिष्ठ स्तर ‘क’ वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल तिचा शाल, बुके व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
राहुरी येथील अमन सोशल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी या यशाबद्दल फाउंडेशनच्या वतीने तिचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमन सोशलचे अध्यक्ष इब्राहीम भैयाभाई शेख, आझमभाई पठाण, अब्दुलभाई आतार , समीर शेख सर, जैनुद्दीन शेख, बादशाह शेख, अफजल पठाण आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकार राजेंद्र साळवे यांनी आभार मानले.