Breaking News

सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट हबीब यांचे स्वागत


अहमदनगर / प्रतिनिधी
हेअर स्टाईलसाठी देशासह परदेशातही असंख्य युवक-युवतींच्या गळ्यातील ताईत असलेले सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब नगरमध्ये आले असता चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. या महाराष्ट्रीय पध्दतीने झालेले स्वागताने हबीब भारावले. जावेद हबीब अकॅडमीच्यावतीने माऊली संकुल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय हेअर फॅशन सेमिनारमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ते नगरला आले होते.
एकदिवसीय हेअर फॅशन सेमिनारचे उद्घाटन हबीब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी शहरातील जावेद हबीब अकॅडमीचे संचालक गौरव परदेशी, प्रकाश परदेशी, प्रॉमिनंटचे जावेद शेख, सचिन परदेशी, भाऊ परदेशी, प्रताप परदेशी, सावळा कापडे, भैय्या परदेशी, महाराष्ट्र नाभिक संघटनेचे अध्यक्ष शांताराम राऊत, संजय मदने, अकॅडमीचे प्रशिक्षक प्रणव नेवे, गौसिया शेख आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.