Breaking News

कोतुळचा बैठा सत्याग्रह बाराव्या दिवशी मागे कोतुळ/प्रतिनिधी
 कोतुळ येथे नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती, पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन, कोतुळ पुलांचे काम तातडीने सुरू करावे, तोलारखिंड रत्याचे काम काम करावे आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी किसान सभा, पिंपळगाव खांड धरण कृती समिती तोलारखिंड विकास कृती समितीच्या वतीने कोतुळ (ता. अकोले) येथे सुरू असलेले मुक्कामी बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु होते. सलग १२ दिवस हे आंदोलन सुरु होते. आंदोलकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
 . डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार मुकेश कांबळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता संगीता जगताप, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोलेचे उपविभागीय अधिकारी डी. एन. काकडे, जिल्हा परिषद बांधकामचे उपअभियंता पी एन वाकचौरे, शाखा अभियंता दिनेश बिंद आदी उपस्थित होते. आंदोलकांनी ज्या मागण्या घेऊन आंदोलन सुरू केले होते त्या मागण्या मान्य पूर्ण करण्याआचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यावेळी   शेतकरी नेते कॉ.डॉ. अजित नवले, विनय सावंत, जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख, सयाजीराव देशमुख, राजेंद्र पाटील देशमुख, कॉ. सदाशिव साबळे, भाऊसाहेब बराटे, निलेश तळेकर, डॉ. दामोदर सहाणे, रवींद्र आरोटे, संजय देशमुख, हेमंत देशमुख, सचीन गिते, मछिंद्र देशमुख, गुलाब खरात, सागर देशमुख यांनी यावेळी प्रशासनावर टीका केली. कोतुळ येथे मुळा नदीवर नवीन पूल बांधण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा स्वीकृतीचे पत्र कार्यकारी अभियंता संगीता जगताप यांनी यावेळी दिले. मंगळवारी या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात येईल.- संगीता जगताप, कार्यकारी अभियंता   


ऑपरेशन तोलारखिंड
 तोलारखिंड फोडून मुंबई जवळ करणाऱ्या रस्त्यासाठी आम्ही आग्रही असून यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी कुठलीही प्रशासकीय कार्यवाही केली नाही. केवळ जनतेला या प्रश्नावर भुलवले असा आरोप .डॉ. किरण लहामटे डॉ. अजित नवले यांनी केला. तोलारखिंडचे ऑपरेशन करण्याची जबाबदारी आता आम्ही घेतली आहे. त्यासाठी फॉरेस्ट, वन्यजीव आणि महसूल या तिनही विभागाच्या कामासाठी मुंबई, दिल्ली, भोपाळ या ठिकाणी धडक मारून प्रश्न निकाली काढू असे अजित नवले यांनी सांगितले.