Breaking News

थुंकी लावून पानं पलटू नका, कर्मचार्‍यांना आदेश

नवी दिल्ली : थुंकी लावून फाईल्स आणि दस्ताऐवजांची पानं पलटू नका असा आदेश उत्तर प्रदेशमधल्या मुख्य विकास अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना दिला आहे. थुंकीमुळे अनेक संसर्गजन्य रोग पसरू शकतात त्यामुळे थुंकी लावून दस्ताऐवजांची पानं न पटलण्याचा आदेश मुख्य विकास अधिकारी अभिषेक गोयल यांनी दिला आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी हे थुंकी लावून त्यांच्याजवळ  असलेल्या फाईल्सची पानं पलटतात असं निदर्शनास आलं आहे. ही अत्यंत वाईट सवय आहे, यामुळे  संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका अधिक आहे’’ असं गोयल  म्हणाले त्यामुळे कर्मचार्‍यांनी वॉटर स्पंजचा वापर करावा’’ अशा सुचना करण्यात आल्या आहेत. या आदेशाची तातडीनं अंमलबाजवणी करण्याचे आदेश कार्यलयातील अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.