Breaking News

माजी आ. पठाणविरुद्ध कडक कारवाई करा मनसे, सेना, भाजपची निदर्शने


अहमदनगर / प्रतिनिधी
एमआयएमचे माजी . वारिस पठाण याच्या फोटोला जोडे मारुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने त्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मनसेच्यावतीने शनिवारी (दि. २२) महात्मा गांधी पुतळ्यासमोर वारिस पठाण यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. त्यानंतर हा फोटो जाळण्यात येऊन पठाण याचा निषेध करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष डफळ म्हणाले, भारत हा सर्व जातीधर्मात गुण्या गोविंदाने नांदणारा देश आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र राहतात. राष्ट्रीय एकतेला धोका पोहचविण्याचे काम पठाणसारखे देशद्रोही करत असतात. अशा देशद्रोह्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी. असे देशद्रोही हिंदू- मुस्लिम दंगलीला प्रोत्साहित करण्याचे काम करत असून त्याच्यावर कडक कारवाई करावी. या आंदोलनात सचिन डफळ, नितीन भुतारे, मनोज राऊत, इंजि. विनोद काकडे, रतन गाडळकर, गणेश शिंदे, गणेश मराठे, अंबादास गोटीपामूल, अभिनव गायकवाड आदी सहभागी झाले होते. दरम्यान, शहरात भाजप आणि शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्यांनीही माजी . पठाण यांचा पुतळा जाळत पुतळ्याला जोडे मारले. माजी . अनिल राठोड यांनी पठाण याच्याविरुद्ध स्वतः घोषणा देत या प्रवृत्तीचा निषेध केला. ज्यांना इथे रहायचे नाही, त्यांनी पाकिस्तानमध्ये जावे, असे आव्हानही माजी . राठोड यांनी पठाणला दिले. यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगीराज गाडे, विजय पठारे, बाळासाहेब बोराटे, मदन आढाव, परेश लोखंडे, दत्ता कावरे, संतोष गेणाप्पा, गिरीश जाधव, शशिकांत देशमुख, मुन्ना भिंगारदिवे, गणेश झिंजे, संग्राम कोतकर, पप्पू भाले आदी उपस्थित होते. यावेळी पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.