Breaking News

दंगलीच्या वेळी हिंदु होतो

राज ठाकरे यांनी मोर्चा काढून हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. मोर्चा स्वतः ला हिंदु आहे हे दाखवण्यासाठी होता कि कायद्याचे समर्थन करण्यासाठी होता. जर कायद्याचे समर्थन करायचे तर किमान फायदे सांगणे आवश्यक असताना राज साहेब वेगळ्याच वळणावर वळले आणि एक विधान करून टाकले. दंगली झाल्यावर आम्ही हिंदु बनतो. ठाकरे यांच हे विधान अर्ध सत्य आहे. लोकांना मुर्ख बनवण्यासाठी हा खेळ मांडल्या गेला. दंगली झाल्यावर लोक हिंदु बनत नाहीत तर काही चमचेगीरी करणारे लोक लोकांना हिंदू बनवतात. याचे अनेक उदाहरणे भारतात आहेत. कुठेही दंगल घडली की त्यात अगोदर कोणी मुस्लिम आहे का हे बघितलं जाते.
जर चुकुनही त्यात मुस्लिम असेल तर त्याला जातीय दंगलीचे स्वरूप देऊन लोकांना हिंदु बनवले जाते. मुसलमान द्वेष एवढा ठासून भरला आहे कि आम्हाला देश, देशाचे स्थान हे विसरून फक्त हिंदुत्वाला महत्त्व देतो. डोक्याने विचार केला तर आपल्याला हिंदु जबरदस्ती बनवले जाते याचे अनेक उदाहरणे आमच्या समोर येतात. आम्ही दंगल व दंगलखोर जात बघून करतो. नाही की गुन्हा वा वाईट परिस्थिती बघून. नेहरू विद्यापिठामध्ये हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली ते हिंदु होते. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांऐवजी जर चुकुनही तेथे मुस्लिम आढळला असता तर भारत पेटला असता. भिमा कोरेगाव दंगलीमध्ये जर एक मुसलमान असता तर केवढे रान पेटवले असते. छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द बोलाणारा जर मुस्लिम असता तर त्याला कापून टाकले असते.
जेम्स लेन च्या संपर्कात एक जर मुस्लिम असता आणि जेम्स लेन ने शिवरायांवर पुस्तक लिहले असते तर भारतातील मोहल्ले जाळले असते. परंतु यात एकही मुस्लिम नाही. देशात बॉम्बस्फोट घडतात प्रज्ञासिंग ठाकूर सारखे लोक जेल मध्ये जातात आम्ही बिनडोक लोक तिला निवडून देतो. थोडा डोक्याने विचार करा जर प्रज्ञासिंग ठाकूर ऐवजी जर एखादा मुसलमान असता आणि तो निवडणुकिला उभा असता तर सर्व प्रथम त्याला कोणीच उमेदवारी दिली नसती. अपक्ष उभा राहिला असता तर सरळ पुन्हा जेल मध्ये पाठवले असते. जेल मधून सुट्टी वर आलेल्या माणसाला खासदार करणारे लोक खरच किती देशभक्त असतील हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तलवारीला तलवारीने म्हणजे नेमकं कोणाला पत्युत्तर देणार आहेत. छत्रपती शिवरायांचा अवमान केला तेव्हा कुणीच हिंदु अस्तित्वात नव्हते का? जिजाऊ चा, तुकाराम महाराज यांचा अवमान केला जातो तेव्हा एकही हिंदू नसतो तेव्हा हिंदूत्व जाते तरी कुठे. पुण्यामध्ये एका देशमुख विद्यार्थ्यांना हॉटेलमधुन हाकलून दिले जाते तेव्हा हिंदू कुठे असतात. माझ्या देशमुख बांधवाला हॉटेमधुन हाकलणारे हे मुसलमान बांधव नव्हते. हिंदुत्व फक्त मुसलमानांचा द्वेष करणारे असेल तर हा स्वराज्याचा व छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. कारण स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये मुसलमान बांधवांचे योगदान किती आहे हे तपासून घ्यावे. ज्याला स्वतः च्या आजोबाचे पुस्तके वाचता आले नाही ते लोक छत्रपती शिवरायांना कधी वाचणार. शिवरायांशी व स्वराज्याशी एकनिष्ठ असणारे मुसलमान बहुतांश होते.
छत्रपती शिवरायांची राजमुद्रा हाताला बांधून मुस्लिम द्वेष करणार्‍यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात मुसलमान मानासन्माने राहत होते हे विसरता कामा नये. राजमुद्रा हाताला बांधली म्हणजे कुणी मावळा होत नाही. मावळा होण्यासाठी छत्रपती शिवराय काळजात असावे लागतात. ऐर्‍या गेर्‍यांनी छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन पोटभरण्याचे उद्योग करू नये. छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे तर अगोदर छत्रपती शिवरायांचे स्वराज्य व छत्रपती शिवरायांचे विचार स्विकारायला पाहिजे. पुण्यामध्ये खोले बाई यादव बाईला शुद्र आहे म्हणून हिनवते, छत्रपती शिवरायांचा फोटो घरात आहे म्हणून कामावरून कमी केले तेव्हा एकही हींदू बोलला नाही. खोले बाई ऐवजी जर जर मुस्लिम बांवाकडून असे काही घडले असते तर करोडो हिंदु रस्त्यावर उतरले असते. या सर्व बाबीवरून एकच लक्षात येते. कि हिंदुत्व दुसरे तिसरे काही नसुन फक्त द्वेष आहे. लोकांना भावनिक बनवून मुर्ख बनवण्यासाठी मोर्चा काढला.
लोक सुद्धा मुर्ख बनुन टाळ्या वाजवण्यात जास्त मग्न झाले पण कोणीच डोक्याचा वापर केला नाही म्हणून प्रश्‍न उपस्थित केला नाही. आज पर्यंत बघितलं तर परकीय मुसलमानांनी नव्हे तर हिंदुत्वाची ढाल बनवून ढाली आडून स्वतः चे रक्षण करणार्‍या लोकांनी केले हे विसरता कामा नये. खरचं देशाचा विचार करताना मानसाने जाती धर्माच्या माणसाचा बचाव न करता देशाशी गद्दार कोण आहेत हे जाणून घेऊन गद्दाराला शिक्षा होणे महत्त्वाचे असते. पण भारतात दंगल झाली आणि दंगल घडवणारा मुस्लिम सापडला नाही तर तो मुद्दा तिथेच दाबला जातो आणि मुस्लिम सापडला तर त्याला देशद्रोही बनवून बाकिच्या लोकांना देशभक्त व हिंदु बनवले जाते. एवढी घाण माणसिकता भारतात आहे. माणसाने वाईट प्रवृतीला विरोध करावा परंतु भारतात जातीला विरोध करुन जातीय विष पेरले जाते. छठउ च्या माध्यमातून राज ठाकरे म्हणतात बांगलादेशी व पाकिस्तानी मुसलमानांना बाहेर काढा. विदेशी नागरिक विना परवाना व विना माहीती देता देशात राहत असतील तर हा गुन्हाच आहे यात दुमत नाही. परंतु पुढे राज ठाकरे म्हणतात दोन कोटी घुसखोर भारतात आहेत अशी माहिती मिळाली. यावर अनेक प्रश्‍न निर्माण होतात. दोन करोड घुसखोर भारतात आहेत अशी माहिती आहे म्हणजे कुठेतरी याची नोंद असेल. आणि याची नोंद नसेल तर राज ठाकरे यांनी दोन करोड घुसखोरांचा सर्वे केला तरी कधी? दोन कोटी घुसखोरांचा आकडा जसा फिक्स आहे तसे ठिकाण सुद्धा फिक्स असेल मग त्याच दोन करोड लोकांना बाहेर न काढता सरसकट मुस्लिमांना दोष देऊन काय साध्य करायचे आहे.
मिडिया देखील जेथे जायला पाहिजे तेथे जात नाही आणि फालतु गोष्टी ला जास्त महत्त्व देते. 12 जानेवारी ला लाखोंच्या संख्येने सिंदखेडराजा येथे जिजाऊ महोत्सवासाठी लोक येतात. तो कार्यक्रम कधीच लाईव्ह केला जात नाही. परंतु छत्रपती शिवरायांच्या विचारा विरोधात काम करणार्‍या लोकांना जास्त प्रसिद्धी दिली जाते. अजून एक विषेश म्हणजे छत्रपती शिवरायांच्या नावाने पोट भरणारे लोक बँनरवर छत्रपती शिवरायांचा फोटो देखील छापत नाहीत. राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा केला जातो पण या महोत्सवात अजूनही हे बेगडी मावळे वंदन करण्यासाठी येत नाहीत. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन फक्त हिंदुत्वाचे समर्थन करून मुसलमानांना टार्गेट केले जाते.
महाराष्ट्रातील जनता सुद्धां कधीच प्रश्‍न विचारत नाही तुमच्या बँनरवर छत्रपती शिवराय नसतात. छत्रपती शिवरायांच्या जयंतीत कधी जात नाहीत. आणि फक्त मुस्लिमांचा द्वेष करायचा तर अगोदर छत्रपतीचे नाव घेतात आणि मग जातीय घाण ओकतात. काय छत्रपती शिवराय मुस्लिम द्वेषी होते. मग छत्रपतीचे नाव घेऊन मुस्लिम द्वेष करणार्‍याला वठणीवर आणणे आवश्यक आहे ते काम जागृत नागरिक करू शकतो. वाईट प्रवृतींना, गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे पण ती जात बघून होत असेल तर याला न्याय म्हणता येणार नाही.
राज ठाकरे म्हणतात राज्य सरकारला सांगुन काहीच फायदा नाही आता केंद्र सरकारलाच सांगायला पाहिजे. मला एक प्रश्‍न पडतो महाराष्ट्र घुसखोरी फक्त तिन महिन्यातच झाली का? तिन महिन्या पुर्वी तर केंद्रात सरकार असणार्‍यांचेच सरकार तर महाराष्ट्रात होते. मग त्यांनी घुसखोरी होऊच कशी दिली. हजारो करोडो रूपये घेऊन फरार लोक केंद्र सरकार मुळेच तर यशस्वी आहेत. याची माहिती कदाचित राज साहेबांना नसेल. राज ठाकरे यांनी कशाला विरोध करावा आणि कशाला करू नये हा त्यांचा वैयक्तीक विषय आहे. परंतु तोंडातून जातीय घाण ओकताना छत्रपती शिवरायांचे नाव घेणे टाळावे. लोकांना छत्रपती शिवराय, भगवा झेंडा दाखवून हिंदु बनवून हिंदूच्या टाळुवरील लोणी खाऊ नये. स्वतः च्या फायद्यासाठी भारतीय लोकांना हिंदु बनवणे आता तरी थांबले पाहिजे.
एक गोष्ट तर स्पष्ट झाली. लोक देशाचा व देशहिताचा, विचार करून बंधुभावाने नांदत असताना देशात जातीय अराजकता निर्माण करण्यासाठी हिंदू मुसलमान वाद पेटवून लोकांना हिंदु बनवले जाते यामध्ये राजकीय नेते व विद्युत प्रसार माध्यमे यांचे सर्वात मोठे योगदान आहे. बांधवांनो जाती धर्मापेक्षा महत्त्वाचा देश आहे. देशाच्या हितासाठी व देशाच्या कल्याणासाठी  हिंदू मुसलमान बनून फायदा नाही तर देशासाठी भारतीय बनून देशात दंगली घडवणार्‍या, जाती विषयी पेटवणार्‍या जातीय माणसिकता असलेल्या लोकांचा खात्मा करून  भारतीय बनने आवश्यक आहे. भारतीय बनायला प्रामाणिक काळीज पाहिजे. जातीय दंगल घडली की टिव्हि आणि राजकीय नेते आपल्याला बरोबर हिंदु बनवतात.
विनोद पंजाबराव सदावर्ते
मोबा : 9130979300