Breaking News

श्रीगोंदे तालुक्यात मृत बिबट्या आढळला


विसापूर/ प्रतिनिधी ः
श्रीगोंदे तालुक्यात पिंपरी कोलंदर ते उक्कडगाव शिवारात गुरुवारी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला.
उत्तम शिंदे यांनी याबाबत ताबडतोब वनविभागाचे वनरक्षक संदीप भोसले यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व वनक्षेत्रपाल अश्‍विनी दिघे यांचे पथक त्या ठिकाणी आले. हा बिबट्या दोन तीन दिवसांपूर्वीच अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसून जागेवरच मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. या बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा बिबट्या मादी जातीचा होता. त्याचे अंदाजे वय एक वर्ष असावे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मृत बिबट्या ताब्यात घेऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार व डॉ. साबळे यांनी  बिबट्याचे शवविच्छेदन केले. यानंतर बिबट्याचे दहन करण्यात आले.वनविभागाच्या वतीने अज्ञान वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.