Breaking News

कुख्यात गुंड रवी पुजारीला सेनेगल येथून अटक


नवी दिल्ली : रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला पश्‍चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली आहे. सध्या रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये उपस्थित आहेत. हे अधिकारी त्याच्या प्रत्यापर्णाची तयारी करत आहेत. रवी पुजारी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तब्बल 98 गुन्हे दाखल आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नाडीस या नावाने पासपोर्ट तयार करुन सेनेगलमध्ये रहात होता. हा पासपोर्ट 10 जुलै 2013 मध्ये जारी करण्यात आला होता. तो 8 जुलै 2023 पर्यंत वैध आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सेनेगल कोर्टातून जामीन मिळाल्यावर रवी पुजारी फरार झाला होता. भारतीय तपास यंत्रणांच्या इनपुटवरुन रवी पुजारी याला 21 जानेवारी 2019 रोजी सेनेगलमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्याला जामीन मिळाल्याने तो फरार झाला होता. मात्र, सेनेगलमध्येच रहात होता. भारतीय एजन्सी त्याच्यावर सातत्याने नजर ठेवून होती. रवी पुजारीने बॉलिवूड स्टार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना धमक्या दिल्या होत्या. त्याच्याविरुद्ध कर्नाटक व महाराष्ट्रात मिळून तब्बल 98 गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक पोलिसांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवल्याने रवी पुजारी याला पुन्हा अटक करण्यात यश आले आहे. रवी पुजारी याला भारतात आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याला भारतात आणल्यानंतर तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे.
..............................................................................................................................................................................