Breaking News

सावरकरांचे विचार आचरणात आणून देशप्रेम जागृत ठेवा : उपनेते अनिल राठोड


अहमदनगर / प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजून घ्यायचे म्हणजेच संपूर्ण राष्ट्रीय विचार आचरणात आणण्यासारखे आहे. त्यासाठी मनाची, बुद्धीची तितकीच मोठी झेप गरजेची आहे. स्वत:कडे अभुतपूर्व विद्वत्ता असूनही त्याचा अहंकार त्यांनी कधी बाळगला नाही. अंदमानातल्या शिक्षेपासून ते आत्मार्पणापर्यंतच्या दिवसांपर्यंत त्यांचा सगळा प्रवास म्हणजे राष्ट्रीयतेचा लखलखता इतिहास आहे. देशाच्या यज्ञकुंडात त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे देशाप्रती असलेल्या प्रेम व निष्ठेचा आपण अंगिकार केला पाहिजे. देव, देश आणि धर्मासाठी आपले आयुष्य वेचणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आपण आचरणात आणून देशप्रेम जागृत ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौपाटी कारंजा येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्यावतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, विक्रम राठोड, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, अमोल येवले, गिरिष जाधव, शशिकांत देशमुख, गौरव ढोणे, रमेश खेडकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर आदींनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन कार्याचा परिचय करुन दिला. संतोष गेनप्पा यांनी आभार मानले.