Breaking News

उन्नाव बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ भाजप आमदाराचे सदस्यत्व रद्द


उन्नाव : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणातील गुन्हेगार म्हणून न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भाजपा आमदार कुलदीप सेंगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झालं आहे. याबाबत उत्तर प्रदेश विधानसभा प्रमुख सचिव प्रदीपकुमार दुबे यांनी अधिसूचना जारी केली आहे. विधानसभा सचिवालयद्वारे अधिसूचना जारी करण्यात आली असून आमदार कुलदीप सेंगर 20 डिसेंबर 2019 पासून यूपी विधानसभेचे सदस्य नसतील.
कुलदीप सिंह सेंगर हे भाजपा आमदार आहेत ते उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ विधानसभेतून निवडून आले होते. दिल्ली कोर्टात 20 डिसेंबर 2019 रोजी उन्नाव बलात्कार प्रकरणात त्यांच्या दोषारोप सिद्ध झाले आहेत. या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 10 जुलै 2013 च्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कुलदीप सिंग सेंगर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 2017 मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या उन्नाव तरुणी अपहरण आणि बलात्कार प्रकरणात तीस हजारी कोर्टाने भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण लखनऊहून दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टाकडे वर्ग करण्यात आलं होतं. न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी 5 ऑगस्टपासून या प्रकरणावर प्रतिदिन सुनावणी सुरू केली होती. या प्रकरणात न्यायालयाने कुलदीप सिंह सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बलात्काराची अमानुष घडना घडली. या घडनेमध्ये दोषी भाजपाचा आमदार सेंगर यांचे नाव आल्याने हे प्रकरण देशभर गाजले. मात्र, एका सत्तापक्षाचा आमदार असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, पीडिता आणि तिच्या आईनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. पीडितेच्या वडिलांविरोधात 3 एप्रिल 2018ला शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. 28 जुलै रोजी काकांना भेटून परतताना रायबरेलीत पीडिता, तिची काकी, मावशी आणि वकिलांच्या कारला एका ट्रकने धडक दिली. यात काकी आणि मावशीचा मृत्यू झाला होता. तर पीडितेचा वकीलही गंभीर जखमी झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लखनऊहून दिल्लीला आणून जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.