Breaking News

ऑरगॅनिक शेती पद्धतीने विकास शक्य : विखे

कोळगाव/ प्रतिनिधी : ऑरगॅनिक पद्धतीने शेती कशी केली पाहिजे, त्यासाठी कोणत्या पद्धतीची शेती औषधे जी आपल्या शरीरासाठी हानीकारक नाहीत अशी औषधे या कृषी प्रदर्शनात आहेत, ऑरगॅनिक शेती पद्धतीने विकास साधता येईल, असे प्रतिपादन धनश्री सुजय विखे यांनी केले.
श्रीगोंदा शहरात सुरू झालेल्या श्रीगोंदा कृषी महोत्सव 2020 च्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते हे होते.
त्या पुढे म्हणाल्या, “कृषी प्रदर्शन जेथे असते तेथील आसपासच्या शेतकर्‍यांना शेतीसाठी नवनवीन प्रयोग पहायला व करायला मिळतात व याचा त्यांना भविष्यातील शेती कामासाठी उपयोग होतो म्हणून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे.’’
माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, “तालुक्यात होणार्‍या या
कृषी महोत्सवामुळे शेतकर्‍यांच्या ज्ञानात वाढ होऊन याचा उपयोग शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी होईल.’’
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना कार्यक्रमाचे आयोजक ‘वाबळे इव्हेंट’चे अजय वाबळे म्हणाले, “ कृषी प्रदर्शनात उत्कृष्ट बी-बियाणे व खते, आधुनिक शेती अवजारे, शेतीमध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यायचे याविषयीची माहिती, कुकुट पालन, हरितगृह उभारणी, डेअरी तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, शेती मालाचे मार्केटिंग कसे करावे याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन, सोलर विषयीची माहिती, इलेक्ट्रिक बाईक, गृहिणींसाठी गृहोपयोगी वस्तूचे भव्य प्रदर्शन या सारखे अनेक स्टॉल उभारण्यात आले आहेत.’’
 प्रदर्शनातील स्टॉल्सला मान्यवरांनी भेटी देऊन माहिती घेतली. यावेळी मार्केट कमिटीचे सभापती वैभव दादा पाचपुते, डॉ. प्रतिभाताई पाचपुते, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब महाडिक, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, प्रा. तुकाराम दरेकर, अ‍ॅड. सुभाष डांगे, बापू गोरे, संजय जामदार, सुजाता जाधव, प्रमोदिनी शिंदे, सतीश पोखरणा, सहकार उपनिबंधक रावसाहेब खेडकर, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक नगरपालिकेचे सर्व नगरसेवक अनेक पदाधिकारी  यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक बाजार समितीचे सचिव दिलीपराव देवरे यांनी केले. आभार संजय महांडुळे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक शंकर गवते यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाबळे इव्हेंटचे अजय वाबळे, विजयराव शेलार, विशाल सकट यांनी मोलाची कामगिरी बजावली.