Breaking News

चौक सुशोभिकरणाला प्राधान्य : सभागृह नेते स्वप्निल शिंदे


अहमदनगर / प्रतिनिधी
पक्षीय राजकारण बाजुला ठेवून नगर शहराच्या विकासासाठी सर्वांनी पुढे यावे. महापालिकेच्या माध्यमातून सावेडी उपनगराच्या अत्यंत महत्त्वाचा रस्ता प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग चौक महालापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार होणार असून नगर शहराचा मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उपनगराच्या विकासाला अजून चालना मिळणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी येणाऱ्या अडचणी पार करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. विकास कामामध्ये कुणीही राजकारण आणू नये. लवकरच नगर शहरातील प्रमुख चौकांच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेणार आहोत, असे प्रतिपादन सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांनी केले.
प्रभाग क्रमांक चारमधील नवलेनगर येथे बंदपाईप गटार कामाचा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सुमित कुलकर्णी, अमित गटणे, आदिनाथ म्हस्के, योगेश खरमाळे, इंजिनियर निलेश बुरा, महेश तनपुरे, सचिन तनपुरे, प्रसन्ना रामदासी, विजय विधाते, देविदास म्हस्के, विलास रामदासी, इंजिनियर दीपकर गटणे, इंजिनियर शुभकर गटणे, चंद्रकांत जोशी, दत्तात्रय एकबोटे, बाबुलाल प्रथम शेट्टी, ठिगळे सर आदी उपस्थित होते.