Breaking News

शासनाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : बोरुडे

अहमदनगर / प्रतिनिधी
कुंभार समाज संघटनेचे सर्व ज्येष्ठ पदाधीकारी, समाज बाधंव, युवक या सर्वांचे आभार मानतो. मोठ्या विश्वासाने आपण सर्वांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपविली, ती निश्चितपणे सार्थ करुन दिलेल्या संधीचा समाजपयोगी कामे करण्यासाठी सदुपयोग करू. आपणा सर्वांच्या सहकार्याने कुंभार समाजाच्या प्रश्नांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू. कुंभार समाजाच्या शासनाच्या ज्या काही कल्याणकारी योजना असतील त्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कुंभार समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सोनईचे माजी सरपंच अॅड. राजेंद्र बोरुडे यांनी केले.          
कुंभार समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी माजी सरपंच अॅड. बोरुडे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र कुंभार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, 'दैनिक लोकमंथन'चे मुख्य संपादक अशोक सोनवणे यांनी बोरुडे यांना सदर निवडीचे नियुक्तीपत्र नुकतेच दिले. याप्रसंगी बोरुडे यांचा सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना बोरुडे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कुंभार समाजाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, राज्याचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव राऊत, माजी जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष भरत जगदाळे, रामचंद्र खंडाळे सर, महाशिकारे, जोर्वेकर, जाधव महाराज, सुनील सोनवणे, विनय देवतरसे आदी उपस्थित होते. दरम्यान, या निवडीबद्दल ज्येष्ठ नेते आणि साहित्यिक यशवंतराव गडाख, राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकराराव गडाख, मुळा एजुकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख, जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख आदींनी बोरुडे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.