Breaking News

कोल्हार घोटी राज्यमार्ग बनला मृत्यूचा सापळा

संगमनेर/ प्रतिनिधी : “संगमनेर ते कोकणगाव पर्यंतच्या कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या डांबरीकरणाचे काम चालू न झाल्यास वडगावपान येथील शिवसैनिक शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे’’, असा इशारा वडगावपान येथील कार्यकर्ते अर्जुन काशीद यांनी दिला आहे.
संगमनेर ते कोकणगाव दरम्यान कोल्हार घोटी राज्यमार्गावर रस्त्याच्या खड्ड्यांमुळे गेल्या काही वर्षात अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले आहे. निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना जाग येण्यासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार आहे. संबंधित आंदोलनाची कल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व बांधकाम मंत्र्यांना देण्यात आलेली आहे. तरी आठ दिवसांच्या आत या रस्त्यावर डांबर न पडल्यास वडगावपान ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.