Breaking News

शहर परिसरात स्वच्छता रक्षक नेमावेत : बोरकर

अहमदनगर / प्रतिनिधी
शहरामध्ये जानेवारी महिन्यात भारत स्वच्छता अभियानांतर्गत महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिका अधिकारी, कर्मचारी नागरिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात भाग घेऊन शहर स्वच्छ केले. ही चांगली गोष्ट आहे. अभिमानस पात्र आहे. परंतु अभियान संपल्यानंतर महापालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग दिसू लागले. शहरातील बऱ्याच भागात कचरा संकलन गाड्या येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे शहर पुन्हा अस्वच्छतेकडे जाते की काय, अशी भीती निर्माण होत आहे. ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक रस्त्यावर दिसू लागले. त्यामुळे मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा वावर सुरु झाला. परिणामी शहर स्वच्छतेबाबत सर्वत्र उदासीनता दिसून येत आहे. शहरातील ७० टक्के जनता सकारात्मक प्रतिसाद देत आहे. परंतु ३० टक्के जनता अजूनही त्यांच्या सवयीमध्ये बदल करताना दिसत नाही. या सर्वांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी कचरा टाकणाऱ्यांवर निरीक्षण ठेवण्यासाठी स्वच्छता रक्षक नेमावेत, अशी मागणी स्वच्छता रक्षक समितीच्यावतीने नगरसेविका शोभा बोरकर यांनी केली. त्या म्हणाल्या, प्रभाग चारमध्ये तारकपूर, सिव्हिल हाडको, नवलेनगर, चैत्रबन कॉलनी, किर्लोस्कर कॉलनी या भागात ठिकठिकाणी कचरा पडलेला आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये अस्वच्छता दुर्गंधी पसरली आहे. कचरा उचलण्यासाठी साफसफाई करण्यासाठी कोणतीही कचरा गाडी सफाई कामगार येत नाहीत, अशी तक्रार यावेळी उपायुक्त सुनील पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. यावेळी स्वच्छता रक्ष समितीचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रतिभा धूत, सुधा खंडेलवाल, ज्योती दीपक, किरण कालरा, मर्लिन अलिशा, मधूर बागायत आदी उपस्थित होते. यावेळी सुनील पवार यांनी शिष्टमंडळास स्वच्छ संरक्षण २०२० मध्ये गेल्या दोन महिन्यात विलक्षण स्वच्छता कामगिरी केल्यानंतर काही प्रमाणात महापालिका स्वच्छता विभागाकडून दुर्लक्ष होताना दिसत आहे. यापुढील काळात स्वच्छता राखली गेली नाही तर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. स्वच्छ सर्वेक्षण तपासणी काळात शहर स्वच्छतेच्या कामात जवळपास दुप्पट कर्मचारी लावले गेले होते. महापालिकेचे हजार ७० सफाई कामगार असून त्यावेळी प्रत्यक्षात हजार ५०० हून अधिक अधिकारी कामगार मिळून काम करत होते. पण सर्वेक्षण संपल्यावर आता केवळ ७०० कर्मचाऱ्यांद्वारेच सफाई होत आहे. पण नियोजन केल्यास यांच्याद्वारेही शहरच स्वच्छ होऊ शकते. प्लॅस्टिक बंदीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलण्यास विशेष कर्मचारी नियुक्त करुन त्यांच्याद्वारे घंटागाड्यांतून तो कचरा कचरा डेपोवर पाठविण्यास सांगितले आहे. हे काम अधिक व्यापक करण्यासाठी यामध्ये स्वयंसेवी संस्थेचे सदस्य तसेच नगरसेवकांचेही सहभाग घेण्याचे नियोजन आम्ही आता केलेले आहे.