Breaking News

पुरोगाम्यांचे दोन प्रकार ः संघ-नियंत्रित व संघ-भयभित!

बहुजनांनो.... !   
-1-
स्वतःला पुरोगामी, डावे वगैरे म्हणविणारे सर्व लोकआज केवळ उअअ, छझठ वगैरेच्या मुद्द्यावर रान उठवित आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी जनता ‘मुस्लीम’ आहे. आणी त्यांचे नेतृत्व करणारी पुरोगामी मंडळी ‘हिंदू’ आहेत. वास्तविक स्वतःला पुरोगामी म्हणविणार्यात या हिंदू नेत्यांचे स्वतःचे पक्ष आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पक्ष, रिपब्लीकन वगैरे असंख्य पक्ष आहेत. मात्र यापैकी एकही पक्षाने उअअ, छझठ (नागरिकत्व सुधार कायद्या) विरोधात आंदोलन सुरू केलेले नाही. वंचित बहुजन आघाडीच्या एका आंदोलनाचा येथे एक अपवाद नोंदावा लागेल. जेथे मोठ्या संख्येने मुस्लीम एकत्र जमतात, तेथे हे फुरोगामी नेते जातात व भाषणे ठोकतात. 

मात्र वंचितसारखे आंदोलन करणारे पक्ष व मुसलमानांच्या ‘गर्दी’समोर भाषण ठोकणारे सर्वच पुरोगामी नेते एक काळजी घेत असतात. आंदोलनात किंवा भाषणात ते असे कधीच सांगत नाहीत की,‘आपल्या घरावर दोन बोर्ड लावा.’ डावे-पुरोगामी लोक दुःख उगाळत बसण्यामध्ये फार माहीर आहेत. रडतांना कोण किती मोठ्या आवाजाने गळा काढतो, याची स्पर्धाच लागलेली असते. लेख, पुस्तके, अग्रलेख, इंग्रजीत, हिंदीत मोठमोठ्याने आरडाओरडा करून आकाश-पातळ एक करतील. पण या दुःखाचे मूळ काय व मूळ उपाय काय हे मात्र कधीच सांगणार नाहीत. असं नाही की, त्यांना दुःखाचं मूळ माहीतच नाही, असं नाही की, त्यांना या दुःखावरचा उपाय माहीतच नाही. त्यांना सर्व माहीत आहे. या देशातील डावे-समाजवादी जेवढा अभ्यास करतात, तेवढा अभ्यास तर कोणीच करीत नाहीत. मग एवढा अभ्यास करूनही त्यांना अखिल भारतीय दुःखाचं मूळ व त्यावरील उपाय माहीत नाही का? त्यांना ते माहीत आहेच! जरी ते माहीत नसण्याचं नाटक करीत असले, तरी त्यांना माहीत करून देण्याचं काम फुले-शाहू-आंबेडकरांनी अनेक वेळा केलेले आहे. त्यांच्या डाव्या पक्षातील एकमेव प्राच्यविद्यापंडीत असलेल्या कॉ. शरद पाटील (शपा) यांनी पक्षातील पुढार्‍यांना हे दुःखाचे मूळ व त्यावरील उपाय सांगण्यात आयुष्य घालवीलं. परंतू कम्युनिस्ट पक्षातील सर्व पुढार्‍यांनी एकजूट करून शपांनाच पक्षातून घालवीलं! याचा अर्थ या सर्व डाव्या पुढार्‍या ना भारतीय दुःखाचं मूळ व त्यावरील उपाय माहीत आहे, परंतू ते त्यांना ‘वळून’ घ्यायचं नाही. मराठीत एक म्हण आहे- “कळतं पण वळत नाही.’’ डाव्यांच्या या लबाडीचं मूळ त्यांच्या ब्राह्मण्यात आहे, असे शपा सांगतात.
-2-
याचा अर्थ ते काहीच ‘मूळ’ सांगत नाहीत, असा नाही. त्यांच्या मार्क्सवादी आकलनानुसार संपूर्ण जगाच्या सर्वच दुःखांचं मूळ वर्गव्यवस्थेत आहे. भारतातील सर्वच महान तत्वज्ञानी व कृतीशील क्रांतीकारी बुद्ध, फुले, आंबेडकर व शपा शास्त्रशूद्ध पद्धतीने सिद्ध करतात की, भारत खंडाच्या दुःखाचं मूळ वर्ण-जातीव्यवस्थेत आहे. भारतात इंग्रजांच्यासोबत आलेली वर्गव्यवस्थाजातीव्यवस्थेच्या पोटात ‘अपेंडिक्स’ प्रमाणे शिरली. ती जातीच्या पोटातच आहे. ती जातीव्यवस्थेचं पोट फाडून बाहेर येणार नाही, यासाठी प्रचंड काळजी घेतली जात आहे. त्यापैकीच एक प्रयत्न म्हणजे ‘जातवरहीत जनगणना’ व ‘नागरिकत्व सुधार कायदा’ होय! त्यामूळे घाव ‘जाती’च्या मूळावर घातला पाहिजे, ‘वर्ग’ नावाच्या परोपजीवी अपेंडीक्सवर नव्हे. देशातील सर्वच मूलभूत प्रश्‍न जातीव्यवस्थेशी निगडीत असतात. त्यामूळे उअअ, छझठ व उरीीं लशर्पीीी हे दोन्ही प्रश्‍न केवळ आणी केवळ ‘जातीव्यवस्था’ दृढ करण्याशी संबंधित असलेले प्रश्‍न आहेत. हे अत्यंत निकडीचे व जलद गतीने हाताळण्याचे प्रश्‍न आहेत. हे टाईम-लिमिट असलेले प्रश्‍न आहेत. या प्रश्‍नांना जात्यंतकच्या दिशेने वळवून ते प्रतिक्रांतीकारी संघ-ठडड वर उलटवता येतात, हे मी ‘बहुजननामा-98’ मध्ये सिद्ध केले आहे. उअअ, छझठ ला ऊछअ ींशीीं चे वळण द्या आणी जइउ लशर्पीीी ला अङङ लरीींशी लशर्पीीी चे वळण द्या! त्यासाठी दोन बोर्ड तयार करून ते प्रत्येक घरावर कसे लागतील, याचं आंदोलन हाती घ्या! आज फुले-शाहू-आंबेडकर-शपा जीवंत असते तर त्यांनी स्वतःच्या संघटना-पक्षांना आदेश देऊन‘दोन बोर्ड’ आंदोलन यशस्वी केलं असतं. मार्क्स आज जीवंत असता व जगाच्या पाठीवर कुठेही राहीला असता, तरी भारतातील संघ-ठडड च्या दणक्याने जागृत झाला असता व लगेच भारतात येऊन त्यानेही ‘दोन बोर्ड’ लावण्याचे क्रांतीकारक कार्य हाती घतेले असते. आजचे फुले-शाहू-आंबेडकर-शपावाले व मार्क्सवाले लोक खूपच बुद्धीमान आहेत. ते स्वतःला पुरोगामी-क्रांतिकारक म्हणवतात, परंतू ते एकतर‘ठडड-नियंत्रित’ आहेत किंवा ‘ठडड-भयभित’ आहेत. ज्यांना माझे हे म्हणणे अतिशयोक्त वाटत असेल त्यांनी लगेच मोबाईल उचलावा आणी लावा फोन कॉम्रेड कांगोंना! कॉम्रेड कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (उझख) चे एक मोठे नेते आहेत. त्यांनी माझा ‘पवा’मधील जनगणनेवरील लेख वाचला, ओबीसी जनगणनेवर माझ्याशी चर्चा केली, पक्षाच्या मुंबईच्या राज्य अधिवेशनातओबीसी जनगणनेचा ठराव मांडून तो एकमताने मंजूरहीकरून घेतला. त्यानंतर त्यांनी मला पक्षाच्या शहाद्याच्या राष्ट्रीय अधिवेशनात निमंत्रित केले. मी शहाद्याला गेलो परंतू मला स्टेजवर घेण्यास व बोलू देण्यास त्यांनी नकार दिला. 29 डिसेंबर2019 च्या मुंबई कार्यक्रमात सीपीआयचे कॉ. रेड्डी यांनीही माझ्या ‘दोन बोर्ड’ प्रॅक्टिकलधोरणावर अशीच ब्राह्मणी भुमिका घेऊन विरोध केला.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (उझच्) ची या पेक्षा वेगळी स्थिती नाही. सीपीआयपेक्षा सीपीएमचे ब्राह्मण्य जास्त जहरीले आहे. एक नाग आहे तर दुसरा कोब्रा!
-3-
तुम्ही कोणत्याहीमार्क्सवादी, वंचितवादी समाजवादी, फुलेवादी, आंबेडकरवादी, राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना वगैरे-वगैरे नेत्यांना फोन करा व विचारा की, ‘प्रा. श्रावण देवरे यांच्या ‘दोन बोर्ड’ प्रॅक्टिकल प्रोग्रॅमचा का स्वीकार करीत नाहीत.’ त्यांच्याकडेयाचे उत्तरच नाही! तेव्हा ते स्वतःच सिद्ध करतात की, ते एकतर ‘ठडड-नियंत्रित’ आहेत किंवा ‘ठडड-भयभित’ आहेत. कम्युनिस्ट पक्षांना काही एक शास्त्रशूद्ध तत्वज्ञान तरी आहे, मात्र बाकीच्या राजकीय पक्षांना कोणतेही शास्त्रशूद्ध तत्वज्ञान नाही. ते आपापल्या जाती-धर्माच्या अंधारात कुठेतरी चाचपडत असतात व कधीतरी केव्हातरी त्यांच्या हाती एखादा तुकडा लागला की हा तुकडा चघळण्यातच ते धन्यता मानीत असतात.   आजचे बहुतेक सर्वच राजकीय पक्षातील सर्वच दलित-मराठा-ओबीसी-भटके जातीतले नेते एकतर ‘ठडड-नियंत्रित’ आहेत किंवा ‘ठडड-भयभित’ आहेत. अपवाद फक्त कम्युनिस्टांचा आहे. भाकप-माकपचे जे कॉम्रेड नेते आहेत, ते ‘ठडड-नियंत्रित’ किंवा ‘ठडड-भयभित’ नाहीत. ते स्वतःच ब्राह्मण असल्यामुळे ते उअअ, छझठ ला ऊछअ ींशीीं चे वळण देऊ शकत नाहीत व जनगणनेला जातनिहाय(अश्रश्र लरीींशी लशर्पीीी) चे वळण देऊ शकत नाहीत! सर्वच दलित-मराठा-ओबीसी-भटके जातीतले नेते‘ठडड-संघ नियंत्रित’ आहेत किंवा ‘ठडड संघ-भयभित’ आहेत. हे नेते स्वतःहून आपले पक्षप्रमुख-पद, खासदारकी, आमदारकी वा मंत्रीपद सोडून देऊ शकतात व त्या जागी जेलमध्ये जायला न घाबरणार्या  व मृत्युलाही न घाबरणार्याक तरूणांना नेतृत्व देऊ शकतात. परंतू या सर्वच हरामखोर नेत्यांमध्ये ‘पैसे कमविण्याची’ लालसा असल्याने, ते आपले मंत्रीपद, पक्षप्रमुखपद वगैरे लाभार्थीपद सोडणार नाहीत. जनता त्यांना नेतृत्वपदावरून काढूही शकत नाही, कारण हे सर्व नेते ‘ब्राह्मण-मराठ्यां’नी नियुक्त केलेले आहेत.
 जनतेचे नेतेच उघडपणेजनतेशी गद्दारी करीत आहेत, तरीही हे हरामखोर नेते निवडून येत आहेत, आमदार, खासदार, मंत्री होत आहेत. देशात अशी परिस्थती तेव्हाच निर्माण होते, जेव्हा देश एका महाभयंकर संकटाकडे जात असतो. ब्राह्मण, मराठा, ओबीसी, क्षत्रिय, दलित, हिंदु-मुस्लीम वगैरे सर्वच्या सर्व जाती-धर्मातीलसामाजिक व राजकीय नेते जाणीवपूर्वक, ठरवून व थंड डोक्याने प्लॅन करून देशाला संघ-ठडड-प्रणित ‘प्रतिक्रांतीच्या खाईत लोटत आहेत. अशा परिस्थितीत जनतेनेच पुढे यावे व देशाला वाचवावे. आपल्या भारत-खंडाचा इतिहास असे सांगतो, कि जेव्हा जेव्हा आपलेच स्वकीय लोक आपले शत्रू बनून आपल्याला लुटतात, कधी जात-नेते बनून, कधी शूद्र बनवून, कधी अस्पृश्य बनवून जनावरापेक्षाहि जास्त अपमानित करतात, तेव्हा तेव्हा परकीय मुसलमान, परकीय ख्रिश्‍चन भारतात येतात व तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मदत करतात. आताही तुम्ही स्वजातीय-स्वकीय नेत्यांना बाजूला सारून जर स्वतः उभे राहीलात व ‘दोन बोर्ड’ आंदोलन यशस्वी केलं, तर तुम्हाला परकीय प्रगत राष्ट्रे निश्‍चितच मदतीला धावून येतील.  बस्स...! प्रत्येक घरावर दोन बोर्ड लावा! पहिला बोर्ड ऊछअ टेस्टींगवर आधारित नागरिकत्व व दुसरा बोर्ड ‘जातनिहाय जनगणनेचा’ हे दोन बोर्ड लावून जनगणना कार्यक्रम उधळून लावा, नागरिकत्व नोंद कार्यक्रम उधळून लावा, तुमच्या बाजूने जगातील सर्व प्रगत राष्ट्रे उभे राहतील व तुमचा विजय निश्‍चित होईल.हाच मार्ग तुम्हालाजातीअंताकडे घेउन जाईल, याची हमी मी घेतो. आपण सर्वसामान्य जनता म्हणून खरोखर देशी प्रेमी आहोत, दोन बोर्ड आंदोलन निश्‍चित यशस्वी होणार! सर्वांना जयजोती, जयभीम, सत्य की जय हो.....!
प्रा. श्रावण देवरे